Next
दिव्यांगांनाही घरपोच घ्यायला येणार शासकीय वाहन
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी शासनाची विशेष मोहीम
BOI
Wednesday, March 20, 2019 | 05:13 PM
15 0 0
Share this article:

संग्रहित फोटोनाशिक : एकही मतदार मतदानापासून वंचित राहता कामा नये यासाठी शासकीय स्तरावर वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. आता दिव्यांग मतदारांना मतदानाच्या दिवशी घरपोच गाड्या घ्यायला जाणार असून, त्यांचे मतदान झाल्यावर त्यांना घरी पोहोचवण्याचीही सोय केली जाणार आहे. मतदान केंद्रावर व्हीलचेअर, निवारा, पाणी, तसेच मदतनीस यांचीही सोय असणार केली जाणार आहे. त्यामुळे दिव्यांगांना मतदानाचा मार्ग सुकर होणार आहे. याकामी महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागाच्या विभागीय महसूल आयुक्तांची नेमणूक एक्सेसिबिलीटी ऑफिसर म्हणून केली गेली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रात येणाऱ्या पाचही जिल्ह्यांत दिव्यांगांसाठी मतदान केंद्रनिहाय उपाययोजना केल्या जात आहेत. नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त राजाराम माने हे पाचही जिल्ह्यांच्या आढावा घेत आहे. अनेकदा आपल्या शारीरिक अडचणींमुळे मतदान केंद्रावर येणे दिव्यांगांना जिकिरीचे ठरते म्हणून आता शासकीय वाहनाने मतदान केंद्रापर्यंत त्यांना घेऊन येण्यासाठी सध्या यंत्रणा राबवली जात आहे. या यंत्रणेचा भाग म्हणून नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त माने हे पाचही जिल्ह्यांचा आढावा घेत आहेत.

नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांत एकूण ४१ हजार ४९१ दिव्यांग मतदार असून, यातील नाशिकमध्ये नऊ हजार तीन, धुळ्यात चार हजार ३९९, जळगावमध्ये १३ हजार ९१६, नगरमध्ये ११ हजार १४२, तर नंदुरबारमध्ये दोन हजार ५३१ दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. मतदानामध्ये दिव्यांगांचाही टक्का वाढावा या उद्देशाने ही योजना राबवली जात आहे. लोकशाही सक्षमीकरणाकडे टाकलेले हे पाऊल असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहे. मतदानाच्या दिवशी शासकीय सेवेचा घेण्यासाठी दिव्यांगांनी प्रत्येक जिल्ह्याच्या मतदान अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‘प्रत्येक जिल्ह्याला एक प्रमुख नेमलेला असून, मतदानाचा टक्का वाढवा आणि दिव्यांग बांधवाना मतदान करणे सोयीचे व्हावे यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. यामुळे लोकशाही सक्षमीकरण होईल, असा विश्वास वाटतो,’ असे मत विभागीय महसूल आयुक्त माने यांनी व्यक्त केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
L.G.Lanchani About 206 Days ago
Very nice but implementation should be propet
0
0

Select Language
Share Link
 
Search