Next
‘३६०० नवीन उद्योजक बनविणार’
प्रेस रिलीज
Wednesday, December 06 | 03:12 PM
15 0 0
Share this story

राजकुमार बडोलेपुणे : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी ‘स्टँड अप इंडिया योजने’च्या माध्यमातून महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी १०० प्रमाणे ३६०० नवीन उद्योजक निर्माण करणार आहोत. या योजनेसाठी चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात मार्जिन मनीसाठी २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे,’ अशी माहिती समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.

दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे आणि इंडस्ट्रीजचे (डिक्की) संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळासोबत ‘डिक्की’च्या मुख्यालयात बैठक झाली. या बैठकीत प्रत्येक जिल्ह्यात निवडक १०० अनुसूचित जाती-जमातीच्या होतकरू आणि स्वतःचा उद्योग सुरू करण्याची इच्छा असणाऱ्या पदवीधर तरुणांची निवड केली जाईल. निवडण्यात आलेल्या १०० तरुणांचे प्रशिक्षण करण्यात येईल; तसेच त्यांना कंपनी स्थापन करून देऊन प्रत्येकास एक प्रकल्प, सोबत प्रकल्प अहवाल तयार करून देण्यात येईल. त्याचबरोबर त्याला ‘स्टँड अप इंडिया योजने’अंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी सहाय्य करून त्याचा उद्योग उभा करण्यापर्यंतची मदत ‘डिक्की’ करेल,’ असे मिलिंद कांबळे यांनी सांगितले.

हा कार्यकम राजकुमार बडोले, सामाजिक न्यायमंत्री यांच्या व ‘डिक्की’चे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला जाणार आहे. उद्योजक प्रशिक्षणाचा कार्यक्रम सामाजिक विभाग, बार्टी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान आणि ‘डिक्की’ यांच्या वतीने होणार आहे.

या बैठकीत ‘डिक्की’चे उद्योजक आणि पदाधिकारी अविनाश जगताप, राजेंद्र गायकवाड, देवानंद लोंढे, सीमा कांबळे, स्नेहल लोंढे, एन. जी. खरात, ललित बनसोड, रवींद्र लगाडे, प्राजक्ता गायकवाड, मैत्रेयी कांबळे, सत्फुल सोनवणे, कौस्तुभ ओव्हाळे उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link