Next
आनंदवनाचा विकास
BOI
Wednesday, December 12, 2018 | 10:07 AM
15 0 0
Share this article:

कुष्ठरोग्यांची सेवा करण्याच्या ध्येयाने बाबा आमटे यांनी आनंदवनाची निर्मिती केली आणि समाजातील दुर्लक्षित घटकांच्या जीवनात आनंद फुलविला. त्यांचे पुत्र डॉ. विकास आमटे यांनी बाबांचा वसा पुढे नेला. या विकासपुत्राची कहाणी डॉ. चित्रलेखा पुरंदरे यांनी ‘आनंदवनाचा विकास’मधून कथन केली आहे.

बाबांना असाध्य व्याधीने ग्रासल्यानंतर त्यांना बरे वाटावे म्हणून व त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी विकास आमटे यांनी जे प्रयत्न केले ते वाचून पिता-पुत्राच्या अनोख्या नात्याची ओळख होते. आनंदवनाची स्थापना, विकास व प्रकाश यांच्या बालपणातील आठवणी, विकास यांचे छंद, डॉक्टर झाल्यानंतर पेललेल्या जबाबदाऱ्या, त्यांचे सहकारी, कुष्ठरुग्णांना बरे करण्याबरोबरच त्यांना पायावर उभे राहण्यासाठी छोटे उद्योग सुरू करून डॉ. विकास यांनी त्यांना जीवनात उभारी दिली. डॉक्टरांना प्रत्येक पावलावर साथ देणाऱ्या डॉ. भारतीताई आमटे यांचे चित्रणही यात आहे. सतत नाविन्याच्या शोधात असलेल्या विकास ऊर्फ भाऊ यांचे प्रयोग, हेमलकसातील लोकबिरादरी प्रकल्प अशा अनेक प्रकरणांतून डॉ. विकास आमटे या समाजदूताचे व्यक्तिमत्त्व आपल्यापर्यंत पोचते.     

पुस्तक : आनंदवनाचा विकास
लेखक : डॉ. चित्रलेखा पुरंदरे
प्रकाशक : विश्‍वकर्मा प्रकाशन
पाने : १७६
किंमत : २४० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search