Next
गबन
BOI
Thursday, August 22, 2019 | 09:58 AM
15 0 0
Share this article:

मुन्शी प्रेमचंद हे हिंदी साहित्यातील अजरामर लेखकांपैकी एक. त्यांच्या अनेक प्रसिद्ध कादंबऱ्यांपैकी ‘गबन’ ही कादंबरी मराठी वाचकांपुढे सादर झाली आहे. रूपाली भुसारी यांनी या कादंबरीचा मराठी अनुवाद केला आहे. खात्या-पित्या घरातील जालपाचा विवाह रमानाथ या तरुणाशी होतो. शिक्षण अपूर्ण असलेल्या रमानाथला छानछौकीत राहण्याची सवय होती. जालपाला लहानपणापासून दागिन्यांची हौस होती. तिला सोन्याचा हार हवा असतो. येथूनच खोटेपणा सुरू होतो. रमानाथ नोकरी करताना गैरप्रकार सुरू करतो. कर्जबाजारी झाल्याने तो घरातून परागंदा होतो. एका सद्गृहस्थाकडे आसरा मिळाल्यानंतर तो चहाचे दुकान टाकून प्रामाणिकपणे जगण्यास सुरुवात करतो. पैसे हातात खुळखुळायला लागल्यावर पुन्हा त्याची विलासी वृत्ती जागृत होते अन् लबाडी फसवणूक अशा गुन्ह्यांत रमानाथ गुंतत जातो. या प्रवासात जालपा त्याला नैतिकतेचे धडे शिकवते; पण त्याची साथ सोडत नाही. रक्ताच्या नात्यापेक्षाही जवळच्या वाटणाऱ्या व्यक्तींचा सहवास त्यांना मिळतो. या कथानकात त्या काळातील ब्रिटिश संस्कृतीचा प्रभाव, कनिष्ठ मध्यमवर्गीयांची बदलती मूल्ये, आयुष्यातील दुःखे आणि श्रेष्ठ मानवी मूल्यांचे दर्शन होते.

पुस्तक : गबन
लेखक : मुन्शी प्रेमचंद
अनुवाद : रूपाली भुसारी
प्रकाशन : वरदा प्रकाशन
पृष्ठे : ३६८
मूल्य : ४०० रुपये

(‘गबन’ ही कादंबरी ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search