Next
पंकजा मुंडे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
प्रेस रिलीज
Tuesday, July 04 | 02:00 PM
15 0 0
Share this story

पुणे : हडपसरमध्ये दोन जुलै रोजी भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘सन्मान युवा शक्तीचा’ हा गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ पार पडला. राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
‘राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात राहतात; पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. यश संपादन करण्यासाठी अतिशय आत्मविश्वासाने पुढे चालत राहा,’ असे पंकजा मुंडे या वेळी म्हणाल्या. ‘कमवा आणि शिका’ या योजनेची सांगड घालून आपले शिक्षण पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. ‘आयुष्यात कितीही मोठे झालात तरी समाजाची बांधिलकी विसरू नका,’ असा सल्ला त्यांनी दिला.
कार्यक्रमाला आमदार योगेश टिळेकर, पुणे महानगरपालिकेतील भाजपचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले उपस्थित होते.





 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link