Next
नाशिकमध्ये भाजपमधील बंडखोरी पुन्हा चव्हाट्यावर
प्रभात
Friday, March 03, 2017 | 01:35 PM
15 0 0
Share this article:आमदार सीमा हिरे यांची ऑडिओ क्‍लिप व्हायरल

नाशिक - राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणूकीपूर्वी नाशिकमध्ये पैसे देऊन तिकीट वाटप करण्यात येत असलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता नाशिकमध्ये सत्ता मिळविणाऱ्या भाजप आमदारची एक ऑडिओ क्‍लिप सोशय मीडियावर व्हायरल झाली आहे. यामुळे नाशिक भाजपातील बंडखोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

नाशिक महापालिकेसाठी भाजप आमदार सीम हिरे यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचा आरोप केला जात आहे. फक्त 1 मत आम्हाला द्या, बाकीच्या 3 उमेदवारांना मत देऊ नका, अशा आशयाची सीमा हिरे यांची ऑडिओ क्‍लिप व्हायरल झाली आहे. त्यामुळे भाजपचे पराभूत उमेदवार अमोल पाटील यांनी पक्षश्रेष्ठी, मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांकडे सीमा हिरे यांची तक्रारही केली आहे.
सीमा हिरे यांचे दीर नाशिक महापालिकेच्या निवडणूक रिंगणात उभे होते. मात्र त्यांना वगळून प्रभागातील इतर कोणत्याही भाजपच्या उमेदवाराला मत देऊ नका, असे आवाहन या ऑडिओ क्‍लिपमधून केले आहे. तसेच सीमा हिरे यांनी पक्षावर उघड नाराजीही व्यक्त केली आहे. मात्र अद्याप या ऑडिओ क्‍लिपची सत्यता पडताळलेली नाही.
दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर पक्षातर्फे नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार सोहळ्यात नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पक्षातील कुणाचेही नाव न घेता घरभेद्यांमुळेच भाजपचा मोठा विजय हुकल्याचे म्हटले होते.

 
Tags: भाजप
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search