Next
‘सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन’चे पुरस्कार जाहीर
ज्ञानेश्वर मुळ्ये, विश्वमोहन भट्ट, सुरेश तळवलकर, शक्ती कपूर आदींचा होणार गौरव
BOI
Monday, February 04, 2019 | 06:18 PM
15 0 0
Share this article:

डॉ. संजय चोरडिया
पुणे : सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे दिले जाणारे ‘सूर्यदत्ता जीवनगौरव’ आणि सूर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत. 

हुकमीचंद चोरडिया (ग्लोबल आंत्रेप्रिन्युअरशीप), ग्रॅमी पुरस्कारप्राप्त पद्मभूषण विश्वमोहन भट्ट (भारतीय शास्त्रीय कला), ज्ञानेश्वर मुळ्ये (प्रशासकीय सेवा), पद्मश्री तालयोगी पंडित सुरेश तळवलकर (भारतीय शास्त्रीय संगीत), डॉ. अरविंद नातू (विज्ञान-तंत्रज्ञान), रमणलाल शहा (ज्योतिषशास्त्र), शक्ती कपूर (चित्रपट व कला), असितकुमार मोदी (निर्मिती-दिग्दर्शन), फारुक मास्टर (वैद्यकीय सामाजिक सेवा), शाम अगरवाल (पत्रकारिता) यांना ‘सूर्यदत्ता जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे, तर पद्मश्री मिलिंद कांबळे (औद्योगिक सामाजिक सेवा), रितु प्रकाश छाब्रिया (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी), विष्णू मनोहर (हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट), डॉ. अर्चिका सुधांशू (अध्यात्म), संदीप गादिया (सायबर सुरक्षा), लायन विजय भंडारी (सामाजिक उद्योगता व मानवता), मनिष पॉल (मनोरंजन), सुरी शांदिया (बँकिंग अॅन्ड फायनान्स), डॉ. शैलेश गुजर (माध्यम व जनसंपर्क), बीके सुजाथाबेन राठी (वैद्यकीय संशोधन), निवेदिता साबू (फॅशन डिझाइन), मानसी गुलाटी (आरोग्य), विपुल कासार (स्टार्टअप व इनोव्हेशन), अंकिता श्रॉफ (महिला उद्योजक) यांना ‘सूर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र व उपरणे असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सूर्यदत्ता पुरस्काराचे मानकरी
‘सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त हे पुरस्कार देण्यात येत असून, यंदा पुरस्कारांचे सतरावे वर्ष आहे. या पुरस्कार वितरण सोहळा गुरुवारी, सात फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी पाच वाजता बावधन येथील सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये होणार आहे. या पुरस्कारांचे वितरण विद्या वाचस्पती पंडित डॉ. शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट जनरल (डॉ.) डी. बी. शेकटकर (निवृत्त), प्रसिद्ध कवी शैलेश लोढा, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक उपस्थित राहणार आहेत,’ अशी माहिती सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, जनसंपर्क व मनुष्यबळ विभागाच्या संचालिका कॅप्टन शालिनी नायर व नूतन जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. संजय चोरडिया म्हणाले, ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये चालविण्यात येत असलेल्या अभ्यासक्रमांना पूरक विविध क्षेत्रातील आदर्श व यशस्वी व्यक्तिमत्त्वांना हे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. समाजातील वंचित घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी नि:स्वार्थी भावनेने कार्यरत सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचाही सन्मान करण्यात येतो. या वर्षी आरोग्य, तंदुरुस्ती आणि जीवनशैली यावर भर देण्यात आला असून, चार पुरस्कारार्थी या क्षेत्रातील आहेत. शारीरिक आणि मनाच्या तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी या व्यक्तींचे मार्गदर्शन प्रेरक ठरेल, असा मला विश्वास वाटतो. या पुरस्कारार्थींनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासह त्या त्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या कामातून प्रेरणा मिळावी, हा या पुरस्कार सोहळ्यामागील उद्देश आहे. या मान्यवर व्यक्ती सूर्यदत्ता ग्रुपशी जोडल्या गेल्या असून, विद्यार्थ्यांना त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे.’  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search