Next
चित्रकलेतील प्रावीण्याबद्दल विद्यार्थ्यांना माजी शिक्षिकेकडून शिष्यवृत्ती
फाटक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश
BOI
Wednesday, February 13, 2019 | 03:12 PM
15 1 0
Share this article:

चित्रप्रदर्शन पाहताना मान्यवर

रत्नागिरी :
रत्नागिरीतील फाटक हायस्कूलच्या १९७०च्या बॅचच्या माजी विद्यार्थिनी आणि निवृत्त शिक्षिका सुधा पेडणेकर यांनी चित्रकलेतील प्रावीण्याबद्दल हर्ष राजेंद्र कांबळे व आर्यन दीपक भारती या दोन विद्यार्थ्यांना प्रत्येक पाच हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली. वडील (कै.) रामचंद्र व काका (कै.) श्यामराव पेडणेकर यांच्या स्मरणार्थ प्रति वर्षी दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते दोघेही फाटक हायस्कूलचेच माजी विद्यार्थी होते.

आर्यन भारती

फाटक हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन सुधा पेडणेकर यांच्या हस्ते ११ फेब्रुवारी २०१९ रोजी झाले. १३ फेब्रुवारीपर्यंत सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत हे प्रदर्शन सुरू होते. उद्घाटनानंतर पेडणेकर यांनी दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम प्रदान केली. चित्रकलेत करिअरची चांगली संधी आहे. परंतु महागडे रंगसाहित्य घेणे विद्यार्थ्यांना शक्य होत नाही. या करिता पेडणेकर यांनी ही शिष्यवृत्ती देण्याचे ठरवले.

हर्ष कांबळे

या वेळी पालक सेजल भारती, सुमेधा गायकवाड, माधवी कांबळे यांच्यासमवेत दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा अॅड. सुमिता भावे, सचिव दाक्षायणी बोपर्डीकर, मुख्याध्यापिका शुभांगी वायकूळ, चित्रकला शिक्षक नीलेश पावसकर उपस्थित होते. चित्र प्रदर्शनात पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची १२० चित्रे झळकली आहेत. त्यातील ५० चित्रांना फ्रेम केली आहे. 

प्रदर्शनातील चित्रे

फाटक हायस्कूलचे कलाशिक्षक दिलीप भातडे, नीलेश पावसकर यांनी दिवाळीनंतर दर रविवारी विद्यार्थ्यांना लँडस्केप चित्रे रेखाटण्यासाठी घेऊन जाण्याचा उपक्रम २०१३पासून राबवला आहे. सुरुवातीला यात दोन-तीन मुले असायची; पण आता ही संख्या ६५पर्यंत पोहोचली आहे. निसर्गातील रंगछटा पाहून त्या रेखाटण्याची कला विद्यार्थी आत्मसात करत आहेत. 

प्रदर्शनातील चित्रे

‘अलीकडेच थिबा राजवाड्यात झालेल्या आर्ट सर्कलच्या कला जत्रेतही या विद्यार्थ्यांची अनेक चित्रे विकली गेली. त्यामुळे या विद्यार्थ्यांना चित्रांतून पहिल्या कमाईचा आनंद मिळाला आहे,’ असे नीलेश पावसकर यांनी सांगितले. 

प्रदर्शनातील चित्रे

‘विशेष म्हणजे ज्या दोघांना यंदा शिष्यवृत्ती मिळाली, ते यंदा दहावीची परीक्षा देत असून, तरीही ते न चुकता दर रविवारी चित्रे काढण्यासाठी येतात. परीक्षा आहे म्हणून दांडी मारत नाहीत. परीक्षेतही ते उत्तम गुण मिळवतील, याकडे शाळेचे लक्ष आहे,’ असेही पावसकर यांनी नमूद केले. 

(चित्रप्रदर्शनाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...)


 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
मकरंद About 207 Days ago
श्रीमती पेडणेकर यांच्या दातृत्वाला सलाम
1
0

Select Language
Share Link
 
Search