Next
पुण्यातील युवकांनी उभारली ‘अन्नदाता गुढी’
प्रेस रिलीज
Tuesday, March 20, 2018 | 03:40 PM
15 0 0
Share this article:

पुणे : येथील युवकांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन अन्नदाता गुढी उभारली; तसेच त्यांच्या हक्कांबाबत समाज जागृतीही केली.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नेवासा (जि. अहमदनगर) येथील सोंदाळा गावातील शेतकरी सूर्यभान अरगडे, उत्सव धुमाला गावातील शेतकरी दिलीप काकडे, पांडुरंग कदम या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन अन्नदाता गुढी उभारली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करून त्यांना प्रत्येकी ११ हजारांचा धनादेश दिला.

या उपक्रमाबाबत माहिती देताना बागुल म्हणाले, ‘या उपक्रमाचे हे पाचवे वर्ष आहे. यापूर्वी पुणे पत्रकार संघात दर्पण गुढी, २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले वरिष्ठ पोलीस अधिकारी अशोक कामठे यांच्या घरी शौर्य गुढी, सातारा येथील शहीद संतोष महाडिक यांच्या घरीही गुढी उभारण्यात आली होती. पाकिस्तानच्या ताब्यातून १२४ दिवसांनंतर सुटून आलेले शिपाई चंदू चव्हाण यांच्या धुळे येथील निवासस्थानी देखील गुढी उभारली होती. सामाजिक कर्तव्याच्या जाणीवेतून हा उपक्रम आम्ही राबवत असून, पुण्यातील नगरसेवक आणि माजी महापौर आबा बागुल यांचे मार्गदर्शन मिळत आहे.’

या उपक्रमात पुण्यातील संतोष पवार, योगेश निकाळजे, धनंजय कांबळे, संतोष गेळे, गोरख मरळ, इम्तियाज तांबोळी, अभिषेक बागुल, अॅड. चंद्रशेखर पिंगळे, विक्रांत गायकवाड, उमाकांत गायकवाड, भरत तेलंग, सुयोग धाडवे, महेश ढवळे, प्रकाश आरणे, समीर शिंदे, अॅड. प्रताप डांगे, निवृत्ती काळे, बाबालाल पोळके, बद्रीशेठ चिंधे, संजय सुखदान, बाळासाहेब देवखिळे, वैशाली अरगडे, रेवणनाथ पवार, माधवराव काळे, संजय दवांडे, शिवाजी अरगडे, अशोक शिंदे, महेंद्र चव्हाण, अमर ससाणे हे सहभागी झाले होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search