Next
‘टाटा स्काय मुंबई फिल्म फेस्टिव्हल’चे आयोजन
प्रेस रिलीज
Monday, October 09, 2017 | 02:41 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘टाटा स्काय’ने  गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही ‘टाटा स्काय मुंबई फिल्म फेस्टिव्हल’चे आयोजन केले आहे. दोन महिने चालणाऱ्या या महोत्सवामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातील आणि जगभरातील विविध भाषांमधील पुरस्कारविजेते, कौतुक झालेले उत्तम चित्रपट चित्रपट रसिकांना घरबसल्या पाहता येणार आहेत, ते ही अगदी मोफत. टाटा स्कायवर स्टार आणि जिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलच्या सहयोगाने हे चित्रपट उपलब्ध  होणार आहेत,अशी माहिती टाटा स्कायचे चीफ कंटेट ऑफिसर अरुण उन्नी यांनी दिली. 

ते पुढे म्हणाले,‘अनेक तरुण कलाकारांच्या चित्रपटांना विविध चित्रपट महोत्सवांमधून बक्षीसे मिळतात, समीक्षकांकडूनही कौतुक होते पण या चित्रपटांना प्रेक्षागृहापर्यंत पोहोचता येतेच असे नाही. या चित्रपटांना प्रेक्षागृह मिळण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. असे अनेक चांगले चित्रपट येतात पण याच्या वितरणासाठी पुढे येणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे ते प्रेक्षकांपर्यत पोहोचतच नाहीत. यासाठी टाटा स्कायने हे फिल्म फेस्टीव्हलचे व्यासपीठ आणले आहे. याचा उद्देश दरवर्षी अत्यंत दर्जेदार सिनेमे जास्तीत जास्त प्रेक्षकांसमोर आणणे हा आहे. आमच्या व्याप्तीमुळे आम्हाला भारतात प्रामुख्याने चित्रपट महोत्सव उपलब्ध नसणाऱ्या व मुख्य सांस्कृतिक केंद्रांपासून दूर असलेल्या प्रदेशांत चांगल्या कलेला व उत्तम टॅलेण्टला पाठिंबा देणे शक्य होते.’

‘या वर्षी, १ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत रंगणाऱ्या या फिल्म फेस्टीव्हलमध्ये हिंदी, इंग्रजी, पंजाबी, मराठी, आसामी, मणिपुरी आदी भारतीय भाषांसह आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रपट(सबटायटल्ससह) प्रदर्शित करण्यात येतील. या ३०  चित्रपटामध्ये नटरंग, फँड्री, व्हेंटिलेटर, तसे कुर्दी व गंगूबाई अशा मराठी सिनेमाचांही समावेश आहे’, असे ही त्यांनी सांगितले.

पुण्यातील एफटीआयआय संस्थेतून शिक्षण घेतलेल्या हिर गांजावाला आणि अनादी आठल्ये यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह बनवलेल्या ‘मोर मन के भरम’ या चित्रपटाचा यात समावेश असून या चित्रपटाला ‘जिओ मामि विथ स्टार २०१५’ महोत्सवात परिक्षकांचे विशेष पारितोषिक मिळाले आहे. या व्यासपीठामुळे अतिशय मेहनत घेऊन बनविलेले चित्रपट लोकांपर्यत पोहोचवणे शक्य झाले आहे, ही खूप मोठी संधी असल्याचे मत अनादी आठल्ये आणि हिर गांजावाला यांनी व्यक्त केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link