Next
हिमायतनगरचे नगराध्यक्ष कुणाल राठोड यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
नागेश शिंदे
Wednesday, May 15, 2019 | 04:02 PM
15 0 0
Share this article:

कुणाल राठोडहिमायतनगर : हिमायतनगरचे नगराध्यक्ष कुणाल राठोड यांना १५ मे रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांनी, तसेच समाजाच्या विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी शुभेच्छा दिल्या. ‘जनकल्याणकारी युवा नेता’ अशी ओळख त्यांनी अल्पावधीतच आपल्या कामामुळे निर्माण केली असल्याचे नागरिक सांगतात. 

१५ मे १९८४ रोजी जन्मलेले कुणाल राठोड हे संघाच्या तालमीत वाढलेले नेते. ते शिवसेनेचे प्रतिनिधित्व करतात. समाजकारणाकडे त्यांचा पहिल्यापासूनच ओढा होता. काही कालावधीपूर्वी ते हिमायतनगरचे नगराध्यक्ष झाले. त्यानंतर शहरातील गरीब व वंचित घटकांना घरकुल, रस्ते, वीज, पिण्याचे पाणी, आरोग्य अशा विविध सामाजिक समस्या सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. 

कुणाल राठोड यांचा मित्रपरिवार मोठा आहे आणि त्यांनी तो टिकवून ठेवला आहे. ते कोणाच्याही अडीअडचणीला आवर्जून धावून जातात, असे त्यांचा मित्रपरिवार सांगतो. जातीपातीपलीकडे जाऊन विकासाचे राजकारण करणारे मनमिळावू नेते, अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या कार्याला अनेकांनी शुभेच्छा दिल्या. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search