Next
‘कॅशकरो’च्या वापरकर्त्यांना शंभर कोटींचा कॅशबॅक
BOI
Monday, May 06, 2019 | 03:14 PM
15 0 0
Share this article:


गुरगांंव  : ‘कॅशकरो डॉट कॉम’ या देशातील सर्वात मोठ्या कॅशबॅक आणि कूपन साईटने ‘कॅशकरो’द्वारे वस्तू खरेदी केलेल्या सदस्यांना तब्बल शंभर कोटी रुपयांची कॅश बॅक दिली आहे. २०१३ मध्ये स्थापन झालेली ‘कॅशकरो’ ही एक कॅशबॅक साईट आहे. वापरकर्त्यांनी अॅमेझॉन, फ्लिपकार्ट या साईट्सवर ‘कॅशकरो’द्वारे खरेदी केली, तर त्यांना कॅशबॅकच्या माध्यमातून रिवॉर्ड प्रदान करण्यात येते. ‘कॅशकरो’च्या सदस्यांना थेट त्यांच्या बॅंक खात्यामधून कॅशबॅकची रक्कम काढून देण्याची परवानगी सुद्धा देते.

‘कॅशकरो’चे संस्थापक स्वाती भार्गव आणि रोहन भार्गव

या बाबत अधिक माहिती देताना, ‘कॅशकरो’चे सह-संस्थापक रोहन भार्गव म्हणाले, ‘मागील सहा वर्षांत दररोजच्या सामान्य खरेदीवर आमच्या वापरकर्त्यांना यशस्वीरित्या शंभर कोटी रुपयांचे कॅशबॅक दिला आहे. हा आमच्यासाठी एक महत्वाचा टप्पा आहे. त्यांच्या प्रत्येक खर्चाची रक्कम प्रत्येक वेळी कॅशबॅकच्या स्वरुपात परत करून त्या प्रत्येक खरेदीवर पैसे वाचविण्यात कॅशकरोने त्यांना मदत केलेली आहे. वापरकर्त्यांना त्यांच्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करता येणारी वास्तविक रोख रक्कम देऊन, कॅशकरो वापरकर्त्यांना इंटरनेटवरील सर्वोत्तम डील प्रदान करत आहे. आम्ही ऑनलाईन बिल देयकांवरदेखील कॅशबॅक देतो.’ 

सह-संस्थापक, स्वाती भार्गव म्हणाल्या, ‘कॅशकरो वेबसाईट किंवा अॅपद्वारे खरेदीकरून कॅशबॅकची कमाई केली जाऊ शकते. कॅशकरो वापरकर्ता प्रति वर्ष सरासरी वीस ते पंचवीस हजार रुपये कॅशबॅक कमावतो. हे पैसे काढण्यासाठी अनेक पर्यायदेखील देण्यात आले आहेत. कॅशबॅक साईट वापरकर्त्यांना त्यांच्या बँक खात्यात कॅशबॅक हस्तांतरित करण्याची किंवा अमेझॉन, फ्लिपकार्ट गिफ्ट व्हाऊचरच्या स्वरूपात त्यांची कमाई वापरण्याची परवानगी देते. वापरकर्ता कॅशकरोच्या वेबसाईटद्वारे किरकोळ विक्रेत्याच्या वेबसाईटला भेट देतो आणि खरेदी करतो; तेव्हा किरकोळ विक्रेता कॅशकरोला कमिशन देतो. त्यानंतर कॅशकरो या कमिशनच्या ८० टक्क्यांपर्यंत कॅशबॅक म्हणून वापरकर्त्यासह शेअर करते. ’ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search