Next
‘आशयसंपन्न ‘कंटेंट’ देणाऱ्या जनसंपर्क व्यावसायिकांचे महत्त्व कायम’
‘पीआर’ व्यावसायिकांनी बदलांना सामोरे जाण्यास सज्ज होण्याचे प्रा. अनन्य मेहता यांचे आवाहन
BOI
Monday, May 20, 2019 | 10:37 AM
15 0 0
Share this article:कोल्हापूर :
‘जनसंपर्काचे क्षेत्र झपाट्याने बदलत असून, त्याची गरज कधी नव्हे इतकी वाढली आहे. बदलत्या काळानुरुप या क्षेत्राने तंत्रज्ञानात्मक बदल स्वीकारले आहेतच; पण नजीकच्या काळातही अनेक बदलांना सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी या क्षेत्रातील व्यावसायिकांनी तयार राहावे. बदल होत असले, तरी कंटेंटचे महत्त्व कायम असल्याने आशयगर्भ आणि अर्थपूर्ण कंटेंटची निर्मिती करणाऱ्या जनसंपर्क व्यावसायिकांचे महत्त्व कायम राहणार आहे,’ असे आवाहन पुण्याच्या ‘सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशन’चे प्रमुख प्रा. अनन्य मेहता यांनी कोल्हापुरात केले.

‘पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडिया’च्या (पीआरसीआय) कोल्हापूर चॅप्टरच्या वतीने कोल्हापूर विभागातील जनसंपर्क क्षेत्रातील व्यावसायिकांची पहिली परिषद १९ मे रोजी हॉटेल थ्री लिह्व्ज येथे झाली. या परिषदेच्या उद्घाटन समारंभात ‘जनसंपर्क क्षेत्रातील बदलते प्रवाह’ या विषयावर बीजभाषण करताना प्रा. मेहता बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय घोडावत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बी. एम. हिर्डेकर होते, तर उद्घाटक म्हणून पीआरसीआय-यंग कम्युनिकेटर्स क्लबचे राष्ट्रीय सचिव अविनाश गवई उपस्थित होते.

प्रा. मेहता म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांत जनसंपर्क क्षेत्रात लक्षणीय बदल झाले आहेत. या बदलांशी जुळवून घेण्याचाही या क्षेत्रातील व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला आहे. पारंपरिक जनसंपर्क साधने ते कृत्रिम बुद्धिमत्तेचे आव्हान असा हा प्रवास आहे. या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी हे बदल स्वीकारण्याखेरीज गत्यंतर नाही. तथापि, कंटेंटचे महत्त्व मात्र अबाधित राहणार आहे. त्यामुळे उत्तम पद्धतीच्या आशयगर्भ आणि अर्थपूर्ण कंटेंटची निर्मिती करणाऱ्या जनसंपर्क व्यावसायिकांचे महत्त्व कायम राहणार आहे.’

अध्यक्षीय भाषणात कुलसचिव डॉ. बी.एम. हिर्डेकर म्हणाले, ‘जनसंपर्काच्या क्षेत्राकडून आता सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत. त्यामुळे जनसंपर्क व्यावसायिकांना आता बहुआयामी आणि समाजाभिमुख भूमिका पार पाडणे आवश्यक आहे. वस्तुनिष्ठ माहितीने परिपूर्ण असणाऱ्या समंजस जनसंपर्काची आज मोठ्या प्रमाणात गरज आहे. जनसंपर्क अधिकारी हा त्यामुळे आता विश्वासार्ह माहितीचा स्रोत किंवा वितरक आहे. सौहार्दपूर्ण सुसंवादाच्या प्रस्थापनेमध्ये अशा जनसंपर्काची भूमिका अत्यंत मोलाची आहे.’

या वेळी अविनाश गवई यांनी पीआरसीआय आणि यंग कम्युनिकेटर्स क्लबच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास पाणी घालून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. ‘पीआरसीआय’च्या कोल्हापूर चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. आलोक जत्राटकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सहसचिव रविराज गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले, तर उपाध्यक्ष सतीश ठोंबरे यांनी आभार मानले.

दुसऱ्या सत्रात ‘जनसंपर्क क्षेत्रातील बदलते प्रवाह’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार-संपादक श्रीराम पवार यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला. परिसंवादात शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. निशा मुडे-पवार यांनी ‘जनसंपर्क क्षेत्राची वृद्धी, प्रगती व विकास’ या विषयावर प्रा. राजेंद्र पारिजात यांनी ‘जनसंपर्क, जाहिरात आणि व्यावसायिक सामाजिक जबाबदारी’ या विषयावर आणि राजेश शिंदे यांनी ‘तंत्रज्ञानात्मक बदलांचा जनसंपर्क क्षेत्रावर प्रभाव’ या विषयावर मांडणी केली. तत्पूर्वी, कालिदास पाटील यांनी ‘जनसंपर्क आणि व्यक्तीमत्त्व विकास’ या विषयावर प्रबोधन केले. या परिषदेला जनसंपर्क व्यावसायिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.  

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search