Next
राज्यस्तरीय काव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन
गुहागरच्या ‘पसायदान प्रतिष्ठान’चा उपक्रम; कविसंमेलनाचे आयोजन
BOI
Saturday, May 04, 2019 | 02:17 PM
15 0 0
Share this article:

पुणे : रत्नागिरीतील गुहागर येथील ‘पसायदान प्रतिष्ठान’च्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय काव्य पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली असून, येत्या सोमवारी (सहा मे) पुण्यातील ‘मसाप’च्या सभागृहात या पुरस्कारांच्या वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी नामवंत कवींच्या कविसंमेलनाचेही आयोजन करण्यात आले आहे. 

‘पसायदान प्रतिष्ठान’च्या वतीने दर वर्षी महाराष्ट्रातील दोन कवींना उत्कृष्ट काव्यलेखनाबद्दल रोख रुपये तीन हजार प्रत्येकी, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन नामवंत साहित्यिकांच्या हस्ते गौरविण्यात येते. या पुरस्कारांचे हे पाचवे वर्ष असून, ‘आता विश्वात्मके देवे’ या वृत्तीतून ही चळवळ सुरू करण्यात आली आहे. २०१८ या वर्षासाठीचे हे दोन पुरस्कार नुकतेच घोषीत करण्यात आले आहेत. यामध्ये संजय चौधरी, नाशिक (कविताच माझी कबर) आणि शैलेश त्रिभूवन, पुणे (अस्वस्थ मनातील शब्द) या दोन कवींना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. 

येत्या सोमवारी (सहा मे) महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे येथे सायंकाळी पाच ते आठ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. यंदा जेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले आणि गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या हस्ते या दोन कवींना सन्मानित करण्यात येणार आहे. या वेळी ज्येष्ठ कवी उद्धव कानडे, ज्येष्ठ साहित्यिक साईनाथ पाचारणे, संशोधक-अभ्यासक डॉ. अरुण प्रभुणे, यशोदीप प्रकाशन पुणेच्या रुपाली अवचरे, ‘रत्नागिरी न्यूज चॅनल’चे राजेश जाधव उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी संदीप वाघोले यांच्या ‘तिची स्पंदने’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते होणार आहे. यशोदीप प्रकाशनतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले असून, वाघोले यांच्या यापूर्वी प्रकाशित ‘जू’ या कवितासंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे.

या कार्यक्रमात निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ कवी उद्धव कानडे या संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. संमेलनात महाराष्ट्रातील नामवंत कवी सहभागी होत आहेत. यात शशिकांत हिंगोणेकर (लातूर), संजय बोरुडे (अहमदनगर), सचिन गांगुर्डे (नाशिक), हनुमंत चांदगुंडे (बारामती), विजय वडवेराव (पुणे), मोहन पाटील (रत्नागिरी पालशेत), शिवाजी चाळक (पुणे), दिनेश भोसले (पुणे), सुरेश कंक (पुणे), सविता इंगळे (पुणे), समृद्धी सुर्वे (चिपळूण), प्रा. तुकाराम पाटील (पुणे), राज आहेरराव (पुणे), शाहीद खेरटकर (चिपळूण) यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीद खेरटकर करणार आहेत. यापूर्वी या पुरस्काराने संतोष कांबळे, गीतेश शिंदे, सचिन गांगुर्डे, डी. के. शेख, संजय गोडघाटे, संदीप वागोले, अनिल पाटील, विजय वडवेराव, कैलास चावडे यांना सन्मानित करण्यात आले आहे. रसिकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे व राजेश जाधव यांनी केले आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search