Next
पुण्यात दिव्यांग जवानांसाठी ‘सैन्य दिवाळी’ सोहळा
‘पिंक लोटस क्लब’तर्फे आयोजन
प्रेस रिलीज
Tuesday, November 06, 2018 | 12:54 PM
15 0 0
Share this storyपुणे : राजकीय पुढारी, सिने तारे-तारका यांच्यासाठी अंथरल्या जाणाऱ्या ‘रेड कार्पेट’वरून चालण्याचा मान नुकताच भारतीय सैन्य दलांतील माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांनी अनुभवला. बँडच्या तालबद्ध मानवंदनेत आणि शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत हा हृद्य सोहळा रंगला.

दिवाळीनिमित्त पिंक लोटस क्लब आणि वेंकॉब यांच्या वतीने ‘सैन्य दिवाळी- सितारे सरहद के’ हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यात या जवानांना व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली. बाणेरमधील वृंदावन लॉन्स येथे झालेल्या या कार्यक्रमात खडकीतील पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटरमधील ९१ दिव्यांग जवानांना ट्रॅक सूट, तिथे राहणाऱ्या ३४ कुटुंबांना मिक्सर, प्रेशर कुकर आणि १२ शिवणयंत्रे या वेळी सन्मानापूर्वक देण्यात आली. सेंटरतर्फे कर्नल मुखर्जी यांनी ही मदत स्वीकारली.हुतात्मा सताप्पा पाटील यांच्या पत्नी अश्विनी यांना एमपीएससीच्या शिक्षणासाठी क्लबतर्फे आर्थिक मदत देण्यात आली. हुतात्मा सौरभ फराटे यांच्या जुळ्या मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना सुरू करून त्याची कागदपत्रे वीरपत्नी सोनाली यांना देण्यात आली. हुतात्मा श्रेयस गलांडे यांच्या मुलांच्या वैद्यकीय खर्चासाठीची आर्थिक मदत वीरपत्नी निशा यांना देण्यात आली; तसेच क्लबतर्फे वीरपत्नी ज्योती विधावे यांना व्यवसायासाठी आर्थिक मदत देण्यात आली. हुतात्मा श्रीकांत वैद्य यांच्या मुलांच्या संगीत शिक्षणासाठी वीरपत्नी केतकी वैद्य यांच्याकडे क्लबने आर्थिक मदत दिली. क्लब सदस्यांच्या वतीने जवानांसाठी सन्मानपत्र, दिवे, मिठाई, सुकामेवा अशी भेट सीमेवर पाठवण्यासाठी देण्यात आली. ही भेट सैनिक मित्र परिवाराचे किरण पाटोळे यांनी स्वीकारली.

‘सत्येंद्र राठी यांनी प्रास्ताविकात या कार्यक्रमामागची क्लबची भूमिका स्पष्ट केली. क्लब सदस्यांनी सादर केलेल्या गणेश वंदनेनी कार्यक्रमाला सुरुवात झाली. निवृत्त लष्करी अधिकारी योगेश व सुमेधा चिथडे यांचा सत्कार करण्यात आला. क्लबच्या महिला सदस्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. शालिनी दहाड यांनी आभार मानले,’ अशी माहिती सरिता मुंदडा आणि वंदना डागा यांनी दिली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
सोमनाथ आदमिले. रोपळे।।बु।। About 132 Days ago
खूप छान आहे.....
0
0

Select Language
Share Link