Next
मोटारींचा अनोखा प्रवास...
BOI
Wednesday, September 12 | 04:01 PM
15 0 0
Share this story

विविध प्रकारच्या गाड्यांचे आकर्षण असणारे अनेकजण आपल्या आजूबाजूला दिसतात. अशा लोकांना कोणत्याही नवीन दिसलेल्या गाडीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. अशाच काही गाडीवेड्यांसाठी जगातली पहिली गाडी, पहिले इंजिन, गाडी कशी बनवली जाते, ती कशी धावते अशा कैक माहितीपूर्ण गोष्टींचा खजिना असलेले ‘गाड्यांविषयी बोलू काही’ हे सुहास ढोक यांचे पुस्तक वाचनीय आहे... या ई-बुकबद्दल...
..............
गाडी हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक जिव्हाळ्याचा विषय असतो. पहिली गाडी, आवडती गाडी, नवीन गाडी अशा विविध माध्यमातून तिच्याबद्दल वाटणारा आनंदही वेगवेगळा असतो. नकळत ती आपल्या कुटुंबातील एक सदस्य बनून जाते. लहानपणी खेळण्यातली गाडी, किशोर वयात स्वप्नातली गाडी आणि नंतर प्रत्यक्षात घेतलेली खरीखुरी गाडी अशी वयाच्या प्रत्येक टप्प्यात प्रत्येकाच्या सोबत असणारी ही गाडी वास्तवात कशी निर्माण झाली? तिचा जन्म केव्हाचा? तिचे प्रकार किती? तिचे तांत्रिक महत्त्व काय? असे कैक प्रश्न प्रत्येकाच्याच मनात कधी ना कधी आलेच असतील. या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे सुहास ढोक यांच्या ‘गाड्यांविषयी बोलू काही’ या ई-बुकमधून मिळू शकतील. 

मोटारींच्या विश्वात तब्बल दोन दशके काम केलेल्या सुहास ढोक यांनी हे मोटारींचा इतिहास सांगणारे पुस्तक लिहिले आहे. परदेशात मोटारींवरती भरपूर पुस्तके उपलब्ध आहेत.  परंतु भारतात आणि विशेषतः मराठीत पहिल्यांदाच अशा विषयावरील पुस्तक हाताळल गेले असल्याचा दावा लेखकाने केला आहे. 
या पुस्तकात मोटारीचा इतिहास उलगडून दाखवला  आहे. इतकेच नाही, तर मोटार कशी तयार होते, ती कोणत्या तत्त्वावर चालते, तिचे कार्य कसे होते या घटकांवरही प्रकाश टाकला आहे. सोप्या भाषेत मोटारींचे विश्व उलगडण्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून मोटारींचे विश्व सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. 

परिवहनाचा शोध अश्मयुगात लागला असे म्हणायला हरकत नाही. या काळात चाकाचा शोध लागला आणि पूढे क्रांती होत गेली. इजिप्शियन काळातील घोडागाडी ही जगातील पहिले वाहन असावे. घोडागाडी ही त्यावेळेसची मोटार कार म्हणूनच वापरली गेली. म्हणूनच कदाचित गाडीच्या इंजिनाची शक्ती मोजण्यासाठी हॉर्स पॉवर हे एकक वापरतात. मोटार गाडीचा इतिहास जेमतेम १३२ वर्षे जूना असला, तरी हजारों वर्षांपासून घोडा हे प्रवासाचे साधन म्हणून वापरले जाते. १८७२मध्ये अमेरिकेत पहिल्या इंजिनाचा शोध लागला. 

१८८५मध्ये जर्मनीत तयार झालेल्या जगातील पहिल्या मोटार कारची कहाणी रंजक आहे. कार्ल बेंझ याने ही मोटार जगासमोर आणली. २९ डिसेंबर १८८५ला कार्लच्या पत्नीने या गाडीने पहिल्यांदा लांबचा पल्ला पार केला. तेव्हा खऱ्या अर्थाने मोटारीचा शोध लागला. तेव्हापासून २९ डिसेंबर हा दिवस जागतिक मोटार दिन म्हणून साजरा केला जातो. 

मोटारीच्या इतिहासातील अशा अनेक रंजक किश्श्यांनी आणि माहितीने परिपूर्ण असे हे पुस्तक आहे. तेव्हा मोटार म्हणजेच आजची कार याबद्दल उत्सुकता आणि आवड असणाऱ्यांसाठी हा एक उत्कृष्ट खजिना आहे. 

ई-बुक : गाड्यांविषयी बोलू काही
पृष्ठसंख्या : २७
मूल्य : ५० रुपये 

(हे ई-बुक बुकगंगा डॉट कॉमवरून खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link