Next
दिवाळी शुभेच्छा देण्यासाठी व्होडाफोनची अनोखी सुविधा
प्रेस रिलीज
Tuesday, October 17, 2017 | 12:03 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी वैयक्तिक जीआयएफ संदेश तयार करण्याची अनोखी सुविधा व्होडाफोन इंडियाने उपलब्ध केली आहे. याद्वारे ग्राहक पर्यावरणपूरक दिवाळी `फुलझरीज’ ग्रिटिंगही आपल्या प्रियजनांसाठी तयार करू शकतात, ऑग्युमेंट रिअॅलिटी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या सेवेचा लाभ घेता येईल. हे वैयक्तिक जीआयएफ आपल्या मित्रपरिवाराला आणि कुटुंबियांनाही पाठवू शकता, यासाठी सोशल मीडियावर त्यांना टॅग करू शकता.  ग्राहकांना १८ आणि १९ ऑक्टोबर रोजी देशभऱातील व्होडाफोन दुकानांत ही सेवा उपलब्ध आहे', अशी माहिती  व्होडाफोन इंडियाच्या व्यावसायिक प्रक्रियेच्या संलग्नित संचालिका कविता नायर यांनी दिली.

 ‘व्होडाफोन नेहमीच ग्राहकांचा विचार करते. यंदाच्या सणासुदीला नावीन्यपूर्ण ऑग्युमेंट रिअॅलिटी (एआर)चा अनुभव घेण्यासाठी आम्ही ग्राहकांना दुकानांत आमंत्रित करत आहोत, याद्वारे आपल्या मित्रपरिवाराला आणि कुटुंबियांना दिवाळीच्या अनोख्या शुभेच्छा देता येणार आहेत.सर्व व्होडाफोनच्या दुकानांत पारंपरिक पद्धतीने पेहराव केलेले व्होडाफोनचे अधिकारी आणि कस्टम क्रिएटेड अधिकारी ग्राहकांना मदत करतील. प्रत्येक ग्राहकाला व्होडाफोनकडून धन्यवाद देणारे कार्डही प्राप्त होईल’, असे ही त्यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search