Next
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विविध पुरस्कार जाहीर
१६ डिसेंबरला प्रदान होणार
BOI
Wednesday, November 28, 2018 | 01:07 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी :
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाकडून यंदाच्या (२०१८) पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. दर्पण पुरस्कार दैनिक सकाळचे बातमीदार मकरंद गंगाधर पटवर्धन यांना, आदर्श पौरोहित्य पुरस्कार वेदमूर्ती रवींद्र पटवर्धन यांना, आचार्य नारळकर पुरस्कार मुग्धा महेंद्र पाध्ये यांना, आदर्श कीर्तनकार पुरस्कार ह. भ. प. पुंडलिक विठ्ठल हळबे यांना, धन्वंतरी पुरस्कार वैद्य सुविनय विनायक दामले यांना, तर उद्योजक पुरस्कार योगेश माधव सरपोतदार यांना जाहीर झाला आहे. १६ डिसेंबर २०१८ रोजी हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जाणार आहेत.

कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, उपाध्यक्ष मिलिंद आठल्ये आणि कार्यवाह शिल्पा पळसुलेदेसाई यांनी २७ नोव्हेंबर रोजी या संदर्भात माहिती दिली. येत्या १६ डिसेंबरला दुपारी तीन वाजता कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात पुरस्कारांचे वितरण होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून ‘पद्मराजे गर्ल्स स्कूल अँड कॉलेज’च्या निवृत्त प्राध्यापिका चित्रा कशाळकर उपस्थित राहणार आहेत. या संघातर्फे अर्ज न मागवता समाजातील व्यक्तींच्या चांगल्या कार्याची दखल घेऊन स्वतःहून पुरस्कार दिले जातात.

मकरंद पटवर्धन यांनी दैनिक सकाळमध्ये २००० सालापासून विद्यार्थी बातमीदार म्हणून सुरुवात केली. शहरातील शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक व अन्य विविध क्षेत्रांमधील वार्तांकनाबरोबरच छायाचित्रणही ते करतात. २००३ ते २००५ या काळात त्यांनी ‘तरुण भारत’मध्येही वार्ताहर म्हणून नोकरी केली. 

वैद्य सुविनय दामले हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील मठ येथील असून, सावंतवाडीच्या आयुर्वेद महाविद्यालयात त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले. वैद्यकीय तपासणीच्या शुल्काऐवजी वस्तुविनिमय पद्धत त्यांनी सुरू केली. ग्रामीण भागातील अनेकांना बिकट आर्थिक परिस्थितीमुळे पैशांच्या रूपात शुल्क देणे जमत नाही. त्याऐवजी त्यांनी उपचारांचा मोबदला म्हणून त्यांच्याकडे असलेल्या वस्तू म्हणजे केरसुणी, गोवऱ्या, नारळ, कोकम, काजूगर, तांदूळ द्याव्यात, अशी ती पद्धत आहे. २०१३मध्ये ‘लिम्का बुक’मध्ये याची दखल घेतली गेली.

ह. भ. प. पुंडलिक हळबे ४० वर्षांपासून कीर्तनसेवा करत आहेत. ऋग्वेद शाखेचे वेदाध्ययन त्यांनी केले आहे. ते मूळचे रत्नागिरी तालुक्यातील निवसर येथील असून, अनेक वर्षे पुण्यात आहेत. 

मुग्धा पाध्ये या कलाशिक्षिका आहेत. यापूर्वी त्यांना राजापूर तालुका शिक्षक परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. शालेय जीवनात त्यांनी काढलेले चित्र जे. जे. स्कूल आर्टमधील प्रदर्शनात झळकले आहे. 

रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील जालगाव येथील रवींद्र पटवर्धन अनेक वर्षे पौरोहित्य करत असून, त्यांनी पुण्यातील पटवर्धन पाठशाळेत याज्ञिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. 

रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील आंजणारी येथील योगेश सरपोतदार हे नावाजलेल्या महालक्ष्मी फूड्सचे मालक असून, कोकणातील यशस्वी उद्योजक आहेत. 

विशेष पुरस्कार
याव्यतिरिक्त अभयराज जोशी, सुधीर नवाथे, संजय नवाथे, अनिकेत हर्षे, मिलिंद आठल्ये, सुहास ठाकुरदेसाई, सिद्धी बोंद्रे, ओंकार पेंढारकर व आदित्य पंडित यांचा संघातर्फे विशेष सत्कार होणार आहे. तसेच विवाहाला ५० वर्षे पूर्ण झालेल्या ज्ञातीतील काही जोडप्यांचा सत्कारही या वेळी केला जाणार आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
SHILPA SHEVADE About 171 Days ago
Congratulations to all of you. We proud of you
0
0
Mrs seema Nanivadekar About 173 Days ago
Congratulations winner
0
0
अजीत गुर्जर About 173 Days ago
अतीशय स्तूत्य उपक्रम ज्ञाती बांधव—भगिनींचा उचीत गौरव
0
0
Kalpana Gune About 174 Days ago
Khup chan upakram Pudhil watchalis shubheccha
0
0

Select Language
Share Link
 
Search