Next
अवनखेड ग्रामपंचायतीला दहा लाखांचा पुरस्कार जाहीर
नाशिक विभागांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा
BOI
Friday, January 11, 2019 | 11:28 AM
15 0 0
Share this article:

नाशिक : नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांमध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत विभागस्तरावर प्रथम क्रमांकाचे दहा लाखांचे बक्षीस दिंडोरी तालुक्यातील (जि. नाशिक) अवनखेड ग्रामपंचायतीला जाहीर झाले आहे.

ग्रामीण भागात स्वच्छता कार्यक्रम राबवून ग्रामस्थांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी ग्रामस्थांचाच सक्रिय सहभाग असावा या उद्देशाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा नाशिक विभागात घेण्यात आली होती. या विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये शासनाच्या समितीने नुकतीच पाहणी केली. यात दहा ग्रामपंचायती विभाग स्पर्धेसाठी पात्र ठरल्या असून, या ग्रामपंचायतींना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

तीन ग्रामपंचायतींना समान गुण मिळाल्याने द्वितीय क्रमांकाचे आठ लाखांचे बक्षीस विभागून देण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. हे बक्षीस राहता तालुक्यातील लोणी बुद्रुक ग्रामपंचायत, चांदवड तालुक्यातील ग्रामपंचायतीला व पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रुक यांना विभागून दिले जाणार आहे. या पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींच्या बक्षिसांचे वितरण २६ जानेवारी २०१९ रोजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नाशिकच्या विभागीय महसूल आयुक्तालय कार्यालयात केले जाणार असून, या प्रसंगी सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांना गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय महसूल आयुक्त राजाराम माने यांनी दिली.पुरस्कार जाहीर झालेल्या ग्रामपंचायती अशा : नाशिक जिल्हा- अवनखेड (ता. दिंडोरी), राजदरेवाडी (ता. चांदवड). धुळे जिल्हा- अजंदे बुद्रुक (ता. शिरपूर), परसामळ (ता. शिंदखेडा). नंदुरबार जिल्हा- वाटवी ग्रामपंचायत (ता. नवापूर), राजवीर ग्रामपंचायत (ता. तळोदा). जळगाव जिल्हा- सुसरी ग्रामपंचायत (ता. भुसावळ), मेहरगाव ग्रामपंचायत (ता. अमळनेर). अहमदनगर जिल्हा- लोणी बुद्रुक (ता. राहता), वडनेर बुद्रुक (ता. पारनेर).
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 180 Days ago
Hope, it will show results . Hope . This Is not just Public relations
0
0
हर्षवर्धन शंकर बोऱ्हाडे About 275 Days ago
झकास बातमी
0
0

Select Language
Share Link
 
Search