Next
‘तरुण पिढीने अवयवदानाच्या जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा’
पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचे आवाहन
BOI
Friday, February 15, 2019 | 03:52 PM
15 0 0
Share this article:ठाणे : ‘आज अनेकांना अवयवांची आवश्यकता आहे. त्यामुळे आजच्या तरुण पिढीने अवयवदानाविषयी जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा,’ असे आवाहन ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी व्यक्त केले.

येथील पुनर्जीवन सामाजिक ट्रस्ट आणि बाळगोपाळ मित्र मंडळाच्या वतीने अवयवदान दिनानिमित्त १३ फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी अवयवदान जनजागृती महारॅली काढण्यात आली. या महारॅलीचा शुभारंभ पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या हस्ते आकाशात रंगीबेरंगी फुडे सोडून करण्यात आला. त्यावेळी रॅलीत सहभागी तरुण-तरुणींना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी आमदार रवींद्र फाटक, विलास जोशी, अधिष्ठाता सौ. खडसे, डॉ. मुकेश शेरे, अमेय महाजन, आयोजक तथा पुनर्जीवन सामाजिक ट्रस्टचे अध्यक्ष विलास ढमाले (अवयवदान चळवळीचे प्रणेते) आदी उपस्थित होते. फणसळकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. हे या उपक्रमाचे १५वे वर्ष होते.  मिनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण केंद्र, फोर्टीज् इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, शतरंगी ग्रुप, सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, सेंट जॉन बाप्टीस्ट ज्युनिअर कॉलेज, राजीव गांधी मेडिकल कॉलेज, किमया किडनी केअर ग्रुप, आर. जे. ठाकूर महाविद्यालय आदी संस्थांबरोबरच हजारो विद्यार्थी, एनएसएस, डॉक्टर्स, नर्सेस, महिला, बॅंडपथक, अवयवदान चित्ररूपी बग्गी आदींचा या महारॅलीत सहभाग होता. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल उसपकर, अमित टण्णू, जिव्हाळा महिला मंडळ अध्यक्षा मंजिरी ढमाले आदींनी मेहनत घेतली.‘अवयव दिनानिमित्त जनजागृती महारॅलीबरोबरच अवयवदान नोंदणी मोहीम राबविण्यात आली. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते एक व सायंकाळी पाच ते रात्री १० या वेळेत ठाण्यातील मासुंदा तलाव, रंगो बापूजी चौक, जांभळी नाका येथे झालेल्या अवयवदान नोंदणी उपक्रमात एकूण एक ३४७ जणांनी अवयवदान व देहदानाचे फॉर्म भरले,’ अशी माहिती आयोजक विलास ढमाले यांनी दिली.

(अवयवदानाच्या जनजागृतीसंदर्भात कार्यरत असलेल्या पुण्यातील ‘रीबर्थ फाउंडेशन’ या संस्थेबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search