Next
‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’
स्मिता खैरे यांनी घडवलेल्या खास साड्या, दागिन्यांचे प्रदर्शन
BOI
Wednesday, January 09, 2019 | 05:28 PM
15 0 0
Share this article:


पुणे : साडी म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या जिव्हाळ्याचा विषय. आपली साडी सर्वांपेक्षा वेगळी असावी, अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. अशा नेहमीपेक्षा वेगळ्या, नव्या जुन्याचा अनोखा संगम साधून खास डिझाइन केलेल्या साड्यांचे प्रदर्शन लक्ष्मी रोडवरील ‘स्मिताज बुटिक’मध्ये आयोजित करण्यात आले आहे. ‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’ ही उक्ती अगदी सार्थ ठरवणाऱ्या स्मिता खैरे यांनी हे प्रदर्शन आयोजित केले आहे. यामध्ये त्यांनी स्वतः डिझाइन केलेल्या साड्यांबरोबर कुर्ते, दागिने, पर्सेस आदी वस्तूही आहेत. 

स्मिता खैरे
खणाच्या साड्यांमध्ये त्यांनी अनेक प्रयोग केले आहेत. त्यामुळे या साड्यांचे सौंदर्य आणखी खुलले आहे. सॉफ्ट सिल्कमध्ये त्यांनी डिझाइन केलेली पैठणी तर विशेषच आहे. लिननमध्येही त्यांनी पैठणी घडवली आहे. हाताने पेंटीग केलेल्या साड्याही नजर खिळवून ठेवतात. याशिवाय कांजीवरम, इरकल असे प्रकारही आहेत. 

साडीबरोबर मॅचिंग दागिने हवेतच. कापडापासून बनवलेले आगळे वेगळे आणि देखणे दागिनेही त्यांनी बनवले आहेत. तसेच वेगवेगळ्या डिझाइन्सच्या कापडी आकर्षक पर्सेसही आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउज, ड्रेसेसही त्यांनी डिझाईन केले आहेत. त्यामुळे एकाच ठिकाणी सगळी खरेदी होऊ शकते. 


स्मिता खैरे यांना स्वतःला साडी मनापासून आवडत असल्याने त्या मोठ्या उत्साहाने गेली अनेक वर्षे साड्यांवर काम करत आहेत. आधी स्वतःपुरता मर्यादित असणारा त्यांचा हा छंद आता व्यवसायात रुपांतरीत झाला असला तरी, त्यात अर्थाजनापेक्षा आगळ्या वेगळ्या साड्या साडी प्रेमी महिलांपर्यंत पोहोचवणे हाच मुख्य उद्देश आहे. त्यामुळे आगळ्या वेगळ्या साड्या अगदी योग्य किमतीत खरेदी करण्याची संधी या प्रदर्शनामुळे उपलब्ध झाली आहे.  

प्रदर्शनाविषयी 
स्मिताज बुटिक 
स्थळ : ‘स्मिताज बुटिक’, गोखले हॉलसमोर, लक्ष्मीरोड.
दिवस व वेळ : शनिवार,१२ व रविवार,१३ जानेवारी, सकाळी ११ ते ७.

( ही बातमी इंग्रजीमधून वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ganesh Relekar About 184 Days ago
Sundarta manje tu.
0
0
Vaishali pendharkar About 193 Days ago
साडया फारच सुंदर मी नंतर भेट देइन
0
0
Nikita oza About 194 Days ago
Nice
0
0
Neelima. Sonaye About 194 Days ago
Ultimate collection ,creative designs...Best of luck.
1
0
Sunanda M Desai About 194 Days ago
Lovely beautiful 👌👌👍👍
1
0
Sunanda M Desai About 194 Days ago
Very beautiful liked 👌👌👍👍👍
0
1
Prachi khaire About 194 Days ago
Very creative ..... all the best
0
0
Rashmi sahasrabudhe About 194 Days ago
Very nice great. I will definitely visit. All the best
0
0
Veena About 194 Days ago
Khup chan
0
0

Select Language
Share Link
 
Search