Next
मराठी चित्रपट महोत्सवाची नामांकने, तांत्रिक पुरस्कार जाहीर
प्रेस रिलीज
Saturday, April 13, 2019 | 11:14 AM
15 0 0
Share this article:

मुंबई : ५६व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवातील प्राथमिक फेरीच्या तीन नामांकनांची शिफारस, तसेच सात तांत्रिक पुरस्कार व बालकलाकाराचे एक अशी आठ पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.

अंतिम फेरीसाठी ‘दिठी’, ‘भोंगा’, ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘फायरब्रँड’, ‘बंदीशाळा’, ‘आम्ही दोघी’, ‘एक सांगायचंय-अनसेड हार्मोनी’, ‘तेंडल्या’, ‘भूर्जी’ आणि ‘चुंबक’ या दहा चित्रपटांचे उत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकांसाठी नामांकन झाले आहे. घोषित पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी नरेंद्र हळदणकर (बंदीशाळा), उत्कृष्ट छायालेखनासाठी सुधीर पळसाने (आणि डॉ. काशिनाथ घाणेकर), उत्कृष्ट संकलनासाठी नचिकेत वाईकर (तेंडल्या), उत्कृष्ट ध्वनीमुद्रणासाठी गंधार मोकाशी (आणि डॉ. काशिनाथ घाणेकर), उत्कृष्ट ध्वनी संयोजनासाठी मंदार कमलापूरकर (पुष्पक विमान), उत्कृष्ट वेशभूषासाठी चैत्राली गुप्ते (एक सांगायचंय- अनसेड हार्मोनी), उत्कृष्ट रंगभूषासाठी विक्रम गायकवाड (आणि डॉ. काशिनाथ घाणेकर), उत्कृष्ट बालकलाकारासाठी श्रीनिवास पोकळे (नाळ)आणि अमन कांबळे (तेंडल्या) यांना पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत.

एक जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर संमत झालेल्या मराठी चित्रपटांपैकी एकूण ६६ मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका राज्य मराठी चित्रपट महोत्सवाच्या प्राथमिक फेरीत दाखल झाल्या होत्या. त्या सर्व चित्रपटांचे प्राथमिक फेरीच्या १४ तज्ज्ञ परीक्षक मंडळाकडून परीक्षण करण्यात आले. घोषित पुरस्कारांव्यतिरिक्त नामांकन लाभलेल्या पुरस्कारासाठी अंतिम फेरीच्या तज्ज्ञ परीक्षक मंडळाकडून संबंधित चित्रपटांचे परीक्षण केले जाणार असून, हे पुरस्कार २६ मे २०१९ रोजी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान केले जाणार आहेत.

अंतिम घोषित पारितोषिके-तांत्रिक विभाग व बालकलाकार : उत्कृष्ट कला दिग्दर्शन कै. साहेबमामा ऊर्फ फत्तेलाल पारितोषिक (५० हजार व मानचिन्ह)- नरेंद्र हळदणकर (बंदीशाळा). उत्कृष्ट छायालेखन कै. पांडूरंग नाईक पारितोषिक- सुधीर पळसाने (आणि डॉ. काशिनाथ घाणेकर). उत्कृष्ट संकलन- नचिकेत वाईकर (तेंडल्या). उत्कृष्ट ध्वनीमुद्रण- गंधार मोकाशी (आणि डॉ. काशिनाथ घाणेकर). उत्कृष्ट ध्वनी संयोजन- मंदार कमलापूरकर (पुष्पक विमान). उत्कृष्ट वेशभूषा- चैत्राली गुप्ते (एक सांगायचंय- अनसेड हार्मोनी). उत्कृष्ट रंगभूषा- विक्रम गायकवाड (आणि डॉ. काशिनाथ घाणेकर). उत्कृष्ट बालकलाकार कै. गजानन जहागिरदार पुरस्कार- श्रीनिवास पोकळे (नाळ), अमन कांबळे (तेंडल्या).

नामांकने : सर्वोत्कृष्ट कथेसाठी कै. मधुसूदन कालेलकर पारितोषिक (५० हजार रुपये व मानचिन्ह)- शिवाजी लोटन पाटील (चित्रपट- भोंगा), सुधाकर रेडडी यवंटी (नाळ), अरुणा राजे (फायरब्रँड). उत्कृष्ट पटकथा पारितोषिक- सुमित्रा भावे (दिठी), शिवाजी लोटन पाटील-निशांत धापसे (भोंगा), अभिजीत शिरीष देशपांडे (आणि डॉ. काशिनाथ घाणेकर). उत्कृष्ट संवादसाठी कै. आचार्य अत्रे पारितोषिक- विवेक बेळे (आपला माणूस), अभिजित शिरीष देशपांडे-गुरू ठाकूर (आणि डॉ. काशिनाथ घाणेकर), अरुणा राजे (फायरब्रँड). उत्कृष्ट गीतांसाठी कै. माडगुळकर पारितोषिक- संजय कृष्णाजी पाटील (गीत- काळोखाच्या वाटेवर उजेड रुसला बाई, बंदीशाळा), सुनील सुखटणकर (गीत- राधे राधे, वेलकम होम), सायली खरे (गीत- दिस येती दिस जाती, न्यूड). उत्कृष्ट संगीतसाठी कै. अरुण पौडवाल पारितोषिक- राजेश सरकाटे (मेनका उर्वशी), शैलेंद्र बर्वे (एक सांगायचय-अनसेड हार्मोनी), नरेंद्र भिडे-संतोष मुळेकर (पुष्पक विमान). उत्कृष्ट पार्श्वसंगीत- संतोष मुळेकर (आणि डॉ. काशिनाथ घाणेकर), विजय नारायण गवंडे (बंदीशाळा), पीयूष कनोजिया (सविता दामोदर परांजपे). उत्कृष्ट पार्श्वगायक- आदर्श शिंदे (गीत- या जगी नसेन मी, सोपस्कार), ऋषिकेश रानडे (गीत- तुझया आठवणीचे, व्हॉट्सअप लग्न), स्वप्नील बांदोडकर (गीत- मला सॉरी म्हणायचंय, माधुरी). उत्कृष्ट पार्श्वगायिका- निहीरा जोशी देशपांडे (गीत- फुंकरीची वादळे, व्हॉट्सअप लग्न), प्रियंका बर्वे (गीत- दिशा पेटल्या दाही, बंदीशाळा), वैशाली सामंत (गीत- तुम्ही येताना केला इशारा, फर्जंद). उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक- दीपाली विचारे (पुष्पक विमान), उमेश जाधव (मेनका उर्वशी), फलवा खामकर (व्हॉट्सअप लग्न). उत्कृष्ट अभिनेता कै. शाहू मोडक पारितोषिक- कै. शिवाजी गणेशन पुरस्कार- के. के. मेमन (एक सांगायचंय-अनसेड हार्मोनी), किशोर कदम (दिठी), सुबोध भावे (आणि डॉ. काशिनाथ घाणेकर). उत्कष्ट अभिनेत्री कै. स्मिता पाटील पारितोषिक- मुक्ता बर्वे (बंदीशाळा), देविका दप्तरदार (नाळ), कल्याणी मुळे (न्यूड). सहाय्यक अभिनेता कै. चिंतामणराव कोल्हटकर पारितोषिक- सुमित राघवन (आपला माणूस), स्वानंद किरकिरे (चुंबक), सचिन खेडेकर (फायरब्रँड). सहाय्यक अभिनेत्री कै. शांता हुबळीकर व कै. हंसा वाडकर- राजेश्वरी सचदेव (फायरब्रँड), नंदीता धुरी (आणि डॉ. काशिनाथ घाणेकर), छाया कदम (न्यूड). उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता कै. काशिनाथ घाणेकर पारितोषिक- आशिष गिरमे (भूर्जी), फिरोज शेख (तेंडल्या), संतोष राममीना मिजगर (पाटील). उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री कै. रंजना देशमुख पारितोषिक- प्रीती रणखंबे (भूर्जी), गौरी कोथावडे (पुष्पक विमान), गुरबानी गील (होडी).

अंतिम फेरीसाठी प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती (पुरस्कारप्राप्त) : बंदीशाळा (शांताई मोशन पिक्चर्स, स्वाती संजय पाटील), एक सांगायचंय-अनसेड हार्मोनी (देवी सातेरी प्रॉडक्शन, प्रभाकर परब), तेंडल्या- (सचिन जगन्नाथ जाधव). प्रथम पदार्पण दिग्दर्शन (चित्रपटाचे नाव आणि दिग्दर्शकाचे नाव) : एक सांगायचय-अनसेड हार्मेानी- लोकेश विजय गुप्ते, चुंबक- संदीप मोदी, तेंडल्या- सचिन जाधव, नचिकेत वाईकर. अंतिम फेरीसाठी उत्कृष्ट चित्रपट : दिठी, भोंगा, आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, फायरब्रँड, बंदीशाळा, आम्ही दोघी, एक सांगायचय अनसेड हार्मोनी, तेंडल्या, भूर्जी, चुंबक.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search