Next
‘आंत्रप्रिनर्स इंटरनॅशनल’तर्फे उद्योजकता दिन साजरा
प्रेस रिलीज
Friday, August 04, 2017 | 06:04 PM
15 0 0
Share this article:पुणे :
‘आंत्रप्रिनर्स इंटरनॅशनल’ या संस्थेतर्फे भारतरत्न जे. आर. डी. टाटा यांचा जन्मदिन ‘उद्योजकता दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त उद्योजकांना विविध पुरस्कार अॅपलॅब उद्योग समूहाचे संस्थापक व भारत चीन आर्थिक आणि सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष पी. एस. देवधर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

‘आंत्रप्रिनर्स इंटरनॅशनल’चे अध्यक्ष संतोष ललवाणी, सचिव चंद्रशेखर भावे, विश्वस्त अतुल कुलकर्णी या वेळी उपस्थित होते. ‘युनिटेक ऑटोमेशन प्रा. लि.’चे व्यवस्थापकीय संचालक भारत भुजबळ यांना एक्सलन्स इन आंत्रप्रिनरशिप, पाळंदे कुरिअरचे समूह संचालक आशिष पाळंदे यांना एक्सलन्स इन आंत्रप्रिनरशिप इन सर्व्हिस इंडस्ट्री, ‘फ्ल्युरोकेम प्रा. लि.’चे संचालक डॉ. सचिन भिलारे यांना एक्सलन्स इन आंत्रप्रिनरशिप इन रिसर्च अँड इनोव्हेशन, ‘सनशाइन अॅळग्री प्रा. लि.’चे संचालक प्रशांत निकम यांना एक्सलन्स इन अॅतग्रिकल्चरल आंत्रप्रिनरशिप, तर ‘आंत्रप्रिनर्स इंटरनॅशनल’ला दिलेल्या योगदानाबद्दल श्रीरंग गोखले यांना विशेष पुरस्काराने या वेळी सन्मानित करण्यात आले.

‘भारतातील उद्योगांना संघर्ष, अडचणी, आव्हानांना तोंड द्यावे लागते. परंतु जेवढी आव्हाने जास्त तेवढी जास्त मजा येते. एकदा आपण उद्योगात उडी घेतली, की या समस्या येणारच, अशी उद्योजक म्हणून आपली मानसिकता झाली पाहिजे. भारताची तरुण पिढी भारतात बदल घडवून आणेल,’ असे मत या वेळी देवधर यांनी व्यक्त केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
MJF Lion Sateesh Rajhans About
It has bene a good tradition to give awards to successful entreprenures every year on 29th July. This year Mr. Prabhakar Deodhar, who is my idol, was chief guest. Even then I missed the programme this year due to prior commitments. Feeling quite sorry for it.
0
0

Select Language
Share Link
 
Search