Next
गुणवंत प्रणव देसाईला ठाणे महापालिका घेणार दत्तक
प्रेस रिलीज
Thursday, June 15, 2017 | 09:44 AM
15 0 0
Share this article:


ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रणव देसाईचा गौरव केला. त्या वेळी प्रणवचे आई-वडील व महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) सुनील चव्हाण आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

ठाणे : अपंग असूनही अॅथलेटिक्समध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविणाऱ्या प्रणव देसाई या खेळाडूचा सर्व खर्च ठाणे महानगरपालिकेतर्फे उचलण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. अपंग खेळाडूंना सर्वतोपरी मदत करण्याबाबत धोरण तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी समाजविकास विभागाला दिल्या आहेत.

एक पाय गुडघ्यापासून नसून आणि हाताची बोटे नसूनही दहावीच्या परीक्षेत ८० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या प्रणवचा महापालिका आयुक्तांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या वेळी प्रणवचे आई-वडील,  महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) सुनील चव्हाण आदी उपस्थित होते. प्रणव देसाई हा वसंत विहार शाळेचा विद्यार्थी असून, ७३ टक्के अपंग असलेल्या प्रणवला गुडघ्यापासून एक पाय आणि हाताची बोटे नाहीत. प्रणव देसाई याने २०० मीटर धावणे आणि ४०० मीटर रिलेमध्ये विशेष प्रावीण्य मिळविले आहे. सध्या तो २०२१-२२च्या पॅरालिम्पिक स्पर्धेची तयारी करत आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी प्रणव देसाई याचा पाच वर्षांपर्यंतचा संपूर्ण खर्च महापालिकेतर्फे उचलण्याची तयारी दर्शविली आहे. त्याचबरोबर त्याच्या पायाच्या उपचारांचा खर्चही महापालिकेच्या वतीने करण्याची तयारी दर्शविली आहे; मात्र या बदल्यात प्रणवला सर्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये महानगरपालिकेचे बोधचिन्ह वापरणे बंधनकारक राहणार आहे.

दरम्यान, अपंग कल्याण योजनेअंतर्गत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मदत करण्याबाबत धोरण तयार करण्याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी समाजविकास विभागाला दिले आहेत. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search