Next
‘रुबी’च्या रक्तदान मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रेस रिलीज
Thursday, June 28, 2018 | 04:53 PM
15 0 0
Share this article:

डावीकडून रूबी हॉल क्लिनिक ब्लड बँकच्या संचालिका डॉ. स्नेहल मुझुमदार, रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट, औंध सिव्हिल हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन डॉ. अशोक नंदापूरकर, रुबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय पठारे आणि प्रकाश ददलानी.

पुणे : रुबी हॉल क्लिनिकतर्फे वर्ल्ड ब्लड डोनर मंथनिमित्त महि​​नाभर रक्तदान मोहिम राबविण्यात आली. निरोगी भविष्याला आकार देण्यासाठी राबविण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान ५११ युनिट्स रक्त संकलित करण्यात आले.

या मोहिमेअंतर्गत चौदा रक्तदान शिबिरे, पोस्टर स्पर्धा, प्रश्नमंजुषा, घोषवाक्य स्पर्धा घेऊन हा दिन साजरा करण्यात आला. तसेच जागरूकता वाढविण्यासाठी कर्मचारी आणि सार्वजनिक शैक्षणिक मोहिमा हॉस्पिटलमध्ये राबविण्यात आल्या. कार्यक्रमास औंध सिव्हिल हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन डॉ. अशोक नंदापूरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान डॉ. नंदापूरकर यांनी रक्तदात्यांची प्रशंसा केली. विशेषतः प्रकाश ददलानी यांची. त्यांनी आतापर्यंत १०८ वेळा रक्तदान केले आहे. त्यांच्या हस्ते पोस्टर स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक दिले.

या वेळी डॉ. नंदापूरकर म्हणाले, ‘ऐच्छिक रक्तदाते हे अनेक क्षेत्रांतील असतात; पण तरीही त्यांच्यात एक गोष्ट समान असते ती म्हणजे निःस्वार्थी भावना. स्वतःपेक्षा ते दुसर्‍याला अधिक महत्त्व देतात. ज्या लोकांना ते ओळखतही नसतात. प्रत्येक वेळी रक्तदान करतेवेळी निःस्वार्थीपणाचीच त्यांची कृती असते. प्रत्येकवर्षी हा महिना निरोगी आणि सुरक्षित रक्तपुरवठ्याचे जतन आणि रक्त उत्पादनांची गरज अधोरेखित करतो व लोकांना नियमित रक्तदाते बनण्यासाठी प्रोत्साहित करतो. मला या संधीचा उपयोग करून अशा स्वयंसेवकांचे आभार मानायचे आहेत ज्यांच्या रक्तदानामुळे जगण्यासाठी रक्तसंक्रमणाची गरज असलेल्या रूग्णांना जीवनदान मिळाले आहे.’

रक्तदानाच्या गरजांचे महत्त्व पटवून देताना रूबी हॉल क्लिनिक ब्लड बँकच्या संचालिका डॉ. स्नेहल मुजूमदार म्हणाल्या, ‘बहुतेक शस्त्रक्रिया, अवयव प्रत्यारोपण आणि कर्करोगाचे उपचार जे रोज केले जातात त्यांना रक्त संक्रमणाची आवश्यकता असते. गंभीर आजारांमध्ये आयुष्य वाचविण्याबरोबरच रक्त आयुष्याची गुणवत्ता सुधारण्यामध्ये मदत करते. आपली कितीही वैज्ञानिक प्रगती झाली असली, तरी रक्तदानाच्या माध्यमातूनच रक्त प्राप्त केले जाऊ शकते. कारण मानवी रक्तासाठी दुसरा कोणताही पर्याय नाही.’

‘रक्तदात्यांचे औदार्य रुग्णांना आवश्यक रक्तपुरवठा करण्यामध्ये मदत करू शकते. तुम्ही एकदा केलेल्या रक्तदानामुळे तीन रुग्णांचे प्राण वाचू शकतात आणि यासाठी तुम्हाला फक्त तुमचा एक तास द्यावा लागतो. आम्हांला मिळालेल्या प्रतिसादामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. अन ज्यांच्या योगदानामुळे आणि प्रयत्नांमुळे हे शक्य होऊ शकले त्या सर्वांचे मनापासून आभार,’ असे डॉ. मुझुमदार यांनी नमूद केले.

स्वतः रक्तदाता असलेले व रुबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय पठारे म्हणाले, ‘शौर्य हा गुण सामान्यतः अगदी काही लोकांमध्येच आढळतो; पण रक्त आणि प्लेटलेट्सचे दान करून आपल्यामधील अनेकजण हिरो बनू शकतात आणि हे काही फक्त एका दिवसासाठीच नव्हे. ही सर्वात सोपी गोष्ट आहे जी करण्यासाठी तुम्हाला काहीच खर्च करावे लागत नाही. फक्त थोडासा वेळ द्यावा लागतो. आमची रक्त संक्रमणाची जीवनदायी सुविधा ३६५ दिवस असणे आवश्यक आहे आणि यासाठी आमचा कर्मचारी वर्ग रात्रंदिवस प्रक्रिया, तपासण्या करण्यासाठी आणि संकलित रक्त वितरित करण्यासाठी समर्पित असतो.’

‘रुग्णांच्या सध्याच्या आणि भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी दरवर्षी आम्हांला नवीन दात्यांची गरज असते. ज्यामुळे आम्हाला वेगवेगळे रक्तगट उपलब्ध असल्याची खात्री मिळते आणि याद्वारे आम्ही प्रत्येकाला आवाहन करत आहोत कि आपला थोडासा वेळ काढून या महान कार्यात आपला हातभार लावा,’ असे आवाहन डॉ. पठारे यांनी केले.

‘रुबी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट म्हणाले, ‘आयुष्य हीच सर्वात उत्तम भेटवस्तू आहे जी आपण एखाद्याला देऊ शकतो. फक्त या महिन्यापुरतेच नाही, तर संपूर्ण वर्षभर यावर्षीच्या संकल्पनेला पाठिंबा देण्याचे आवाहन करतो. रुबी हॉल क्लिनिकला वर्ष २०२० राष्ट्रीय रक्तपेढीचे मानक प्राप्त झाल्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. आम्ही नेहमीच आमच्या हॉस्पिलटल्सचे एकत्रित नेटवर्क, प्राथमिक आणि विशेष देखभालीच्या सेवा, आपत्कालीन आणि तात्काळ देखभालीची केंद्रे आणि या रक्तदान मोहिमेसारख्या उपक्रमांसह बाह्यरुग्णांसाठीच्या सुविधा यांच्या माध्यमातून निरोगी भविष्याला आकार देण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.’

संकलित झालेल्या रक्ताचा प्रत्येक थेंब उपयोगी पडावा यासाठी अद्ययावत असलेली आणि एनएबीएच प्रमाणित पुण्यातील पहिली रक्तपेढी रुबी हॉल क्लिनिक येथे आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाबरोबरच येथे इरॅडिएशन, ल्युकोडीप्लेशन, अफ्रेसिस आणि कम्पोनंट सेपरेशनसारखे जीवन बदलणारे प्रोटोकॉल्स एकाच छताखाली आहेत. रक्तपेढीने आपल्या सुविधांचा विस्तार हिंजवडी आणि वानवडी या सॅटेलाइट हॉस्पिटलच्या शाखांमध्ये केला आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search