Next
रोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी
BOI
Tuesday, January 08, 2019 | 12:39 PM
15 1 0
Share this storyसोलापूर :
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रजनी देशमुख यांनी सात जानेवारी २०१९ रोजी रोपळे (ता. पंढरपूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला अचानक भेट दिली. ग्रामीण भागातील शाळा असूनही येथील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी विषयाची चांगली तयारी करून घेतली जात असल्याची प्रचीती त्यांना या भेटीत आली. त्यांनी इयत्ता दुसरीच्या वर्गात प्रवेश करताच मुलांनी त्यांच्याशी थेट इंग्रजीतूनच संवाद साधण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषदेच्या शाळेतील दुसरीच्या मुलांचा हा प्रयत्न पाहून त्यांना खूप आनंद झाला.

रजनी देशमुख अंगणवाडीच्या एका कार्यक्रमानिमित्त रोपळे गावात आल्या होत्या. तेव्हा त्यांनी जि. प. प्राथमिक शाळेला अचानक भेट द्यायचे ठरविले. या वेळी सरपंच दिनकर कदम, कान्हापुरीच्या सरपंच स्मिता पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मोहन काळे, बाळासाहेब भोसले, रावसाहेब भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्याध्यापक सुनील शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले. या वेळी देशमुख यांचा पद्मिनी व्यवहारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी थेट इयत्ता दुसरीच्या वर्गाची पाहणी केली. त्यांनी वर्गात प्रवेश करताच विद्यार्थ्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. दरम्यान विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी इंग्रजीतून संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावरून त्यांना या शाळेतील मुलांची इंग्रजी विषयाची चांगली तयारी करून घेतली जात असल्याचे कळले. मराठी विषयाचाही त्यांचा अभ्यास चांगला असल्याचे त्यांना समजले. रोजच्या बोलण्यासाठी मराठी भाषेचाच वापर करण्याचे त्यांनी मुलांना सांगितले. मुलांनी त्यांचे नाव इंग्रजीतून काढून दाखविले. इंग्रजी स्पेलिंग लिहिण्याची शिक्षकांनी मुलांना शिकविलेली सोपी पद्धत त्यांना आवडली. वर्गशिक्षक अरुण माळी यांनी त्यांना पाढे पाठांतराची वेगळी पद्धतही सांगितली. 

या वेळी वर्षाराणी गोडसे, वैशाली जगताप, कल्पाना माने, छाया मसलखांब, समाधान आयरे, तानाजी ढेकळे, शशिकांत कांबळे, अजिनाथ पवार, प्रमोद लोणारकर हे शिक्षक उपस्थित होते.

(सोबत व्हिडिओ देत आहोत.)

 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Tanaji Dhelake tal .mohol. About 75 Days ago
अतिशय छान.
0
0
Chitrasen Pathrut About 75 Days ago
very nice
1
0
Sunil Kshirsagar About 76 Days ago
very good work sirji
0
0
Arun Mali About 76 Days ago
Mast
1
0

Select Language
Share Link