Next
कोकणातील कलाशिक्षकांची निसर्गचित्रे मुंबईच्या प्रदर्शनात
BOI
Thursday, October 04, 2018 | 11:07 AM
15 0 0
Share this story

नीलेश पावसकर यांचे निसर्गचित्ररत्नागिरी : मुंबईतील आर्ट व्हिजन संस्थेने आयोजित केलेले आठवे कला प्रदर्शन नऊ ते १५ ऑक्टोबरदरम्यान मुंबईतील वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये होणार आहे. त्यामध्ये एकूण १० कलाशिक्षकांची १०० चित्रे झळकणार आहेत. त्यामध्ये रत्नागिरीतील कलाशिक्षकांच्या सुंदर निसर्गचित्रांचाही समावेश आहे.

आर्ट व्हिजन संस्थेचे संस्थापक अर्जुन माचिवले हे मूळचे रत्नागिरी तालुक्यातील तरवळ-माचिवलेवाडी येथील आहेत. ते सध्या घाटकोपर येथील आर. एन. गांधी हायस्कूलमध्ये कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यासह रियाझ काझी, महेश कदम, जावेद मुल्ला यांनी एकत्र येऊन २०१२मध्ये आर्ट व्हिजन संस्थेची स्थापना केली. या संस्थेतर्फे कलाशिक्षकांच्या प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. त्यापैकी आठवे प्रदर्शन ऑक्टोबरमध्ये भरणार आहे.
या प्रदर्शनात माचिवले यांची चित्रे आहेतच; शिवाय रत्नागिरीतील फाटक हायस्कूलमधील कलाशिक्षक नीलेश पावसकर, तसेच सैतवडे येथील न्यू इंग्लिश स्कूलचे कलाशिक्षक रमेश गंधेरे यांची प्रत्येकी नऊ-१० निसर्गचित्रे प्रदर्शनात झळकणार आहेत. ही चित्रे वॉटर कलर, अॅक्रेलिकमध्ये साकारली आहेत. रियाझ काझी, महेश कदम, जावेद मुल्ला, संजय पुराणिक, रूपेश बाईत, कविता पुणेकर, मनोहर बाविस्कर यांची चित्रेही या प्रदर्शनात पाहायला मिळतील.

अर्जुन माचिवलेनीलेश पावसकररमेश गंधेरेया प्रदर्शनात कोकणाच्या निसर्गाची विविध रूपे पाहायला मिळतील. कोकणचा निसर्ग भुरळ पाडणारा आहे. विविध ऋतूंमध्ये मुक्तहस्ते रंगांची उधळण करणाऱ्या या निसर्गाची विविध रूपे रत्नागिरीतील तीन कलाशिक्षकांनी कॅनव्हास, पेपरवर रेखाटली आहेत. कलाशिक्षकांची कला लोकांपर्यंत पोहोचावी व मुलांना धडे शिकवत आपलीही कला वाढवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे, हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे. ‘आर्ट व्हिजन’ने या प्रदर्शनाचा आस्वाद घेण्याचे आवाहन केले आहे.

(या कलाशिक्षकांच्या काही निसर्गचित्रांचा आस्वाद घ्या सोबतच्या व्हिडिओतून...)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Purva Yashwant Dorlekar About 137 Days ago
Excellent.Je Anubhavale tech kunchle Rekhatle!!! Apratim.Khadi kinaryavar mase Garvun shikshan purn karnare Nilesh sir jiddila Salam
1
0
Sudesh Uday Mohite About 137 Days ago
Very nice
1
0
salunke amit About 138 Days ago
Thanks Bytes Of India
2
0

Select Language
Share Link