Next
इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग
BOI
Thursday, January 03, 2019 | 09:51 AM
15 0 0
Share this article:

पैशाची गरज आज पदोपदी भासते. पैशाची आवक मर्यादित असली, तरी त्याचे योग्य नियोजन केले, तर गाठीला पैसा राहतो. यासाठी गुंतवणुकीचे नियोजन व त्यानंतर त्यात वाढ कशी होईल याबाबत अंकित गाला आणि खुशबू गाला यांनी ‘इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग’मधून मार्गदर्शन केले आहे.

सुरुवातीला बचत व गुंतवणुकीचे महत्त्व समजावून दिले आहे. त्यानंतर सर्व प्रकारच्या विम्याची गरज व त्याचे प्रकार याबाबत सांगितले आहे. लवकरात लवकर गुंतवणूक करण्याचे फायदे, एकाच योजनेत जास्त गुंतवणूक न करता त्याचे विविध पर्यायांमध्ये वर्गीकरण करणे याबाबत प्राथमिक माहितीही दिली आहे.

गुंतवणुकीसाठी बॅंक डिपॉझिट व त्याचे प्रकार, पीपीएफ, एनएससी, एसआयपी, म्युच्युअल फंड, शेअर्स, आयपीओ, सोने-चांदी, आरबीआय बाँड, कंपनी फिक्स्ड डिपॉझिट, युलिप, राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग योजना, कमोडिटीमधील गुंतवणूक, रिअल इस्टेट, मुलांच्या भवितव्यासाठी व सिनिअर सिटीझनसाठीची गुंतवणुकीबद्दल यात माहिती आहे. याशिवाय रिव्हर्स मॉर्गेज, सिबिल स्कोअर, सिक्युरिटीवर कर्ज, टॅक्स डिडक्शन, रिटर्न फाइल करणे, मृत्युपत्र व वारस नेमणे आदी गोष्टीही यात आहेत.                

पुस्तक : इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग
लेखक : अंकित गाला, खुशबू गाला
प्रकाशक : बजिंग स्टॉक पब्लिशिंग हाउस
पाने : २४२
किंमत : २७५ रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search