Next
...आणि त्यांचाही वाढदिवस झाला साजरा
कोर्टयार्ड मॅरिएटतर्फे जि. प शाळेतील मुलांचा वाढदिवस
BOI
Friday, April 19, 2019 | 03:55 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘मुले ही देशाचे भविष्य आहेत’ याची जाणीव असलेल्या चाकणमधील कोर्टयार्ड मॅरिएटने येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांसाठी एक अनोखा उपक्रम राबवला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक मुलाचा वाढदिवस कोर्टयार्ड मॅरिएटतर्फे साजरा केला जातो.

या मुलांचा वाढदिवस साजरा करताना त्यांच्यासाठी खास केक बनवला जातो. हॉटेलचे शेफ मुलांच्या आवडीचे खास खाद्यपदार्थ बनवतात. शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, हॉटेलचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला जातो. त्याचप्रमाणे, या मुलांना मदत म्हणून जुन्या, पण चांगल्या अवस्थेतील चित्रांची पुस्तके, कपडे, चपला, पंखे आदी वस्तू दिल्या जातात. या मुलांना शिक्षण घेता यावे, त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी हॉटेल मदत करत आहे.


कोर्टयार्ड मॅरिएटतर्फे राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे या शाळेतील मुले अत्यंत खुश असतात. वाढदिवसाच्या दिवशी ती गोष्टी सांगतात, गाणी म्हणतात आणि या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांबद्दल मनापासून प्रेम, कृतज्ञता व्यक्त करतात.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search