Next
‘गोगटे’च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात
BOI
Saturday, February 02, 2019 | 10:51 AM
15 0 0
Share this article:

कला शाखेच्या १९७४च्या बॅचमधील माजी विद्यार्थी

रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या १९७४च्या बॅचमधील कला शाखेच्या विद्यार्थ्यांचा चौथा स्नेहमेळावा रत्नागिरीतील मथुरा हॉटेलच्या सभागृहात उत्साही वातावरणात झाला.

या दोन दिवसीय मेळाव्याचे प्रास्ताविक करताना राजेंद्र सावंत यांनी या मेळाव्यामुळे स्नेह वृद्धिंगत होण्यास मदत होऊन भावनिक आधार मिळत असल्याचे नमूद केले. या मेळाव्याचे औचित्य साधून माजी विद्यार्थिनी विजया जोशी-लिमये यांनी पीएचडी पदवी संपादन केल्याबद्दल माया शिंदे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.

सत्काराला उत्तर देताना विजया जोशी यांनी या सत्कारामुळे आपण भारावून गेल्याचे सांगून कॉलेजमधील मित्र-मैत्रिणींना भेटून खूप आनंद झाल्याचे सांगितले. सतत शिकण्याचा ध्यास असून, आजही विद्यार्थी म्हणून जीवनात वाटचाल करत असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले. या मेळाव्याच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेणार्‍या विजय सरदेसाई, प्रल्हाद पिलणकर, गौरी मलुष्टे यांचाही या प्रसंगी सत्कार करण्यात आला.

कल्पना मेहेंदळे, सुरेखा दाते, इंद्रायणी प्रभुदेसाई, निसार नाईक, दिलावर मुकादम आदींनी मनोगतामध्ये महाविद्यालयीन जीवनातील स्मृतींना उजाळा दिला. सूत्रसंचालन राजन खानविलकर यांनी केले. यानंतर अंकिता पाटकर हिने सहकार्‍यांसह झुंबा नृत्यप्रकाराचे प्रात्यक्षिक सादर केले. या नृत्यात सारेजण उत्साहाने सहभागी झाले. आरोग्यदृष्ट्या हा नृत्यप्रकार महत्त्वाचा असल्याचे पाटकर यांनी सांगितले.

मेळाव्याच्या दुसर्‍या दिवशी केळ्ये-मजगाव येथील रामकृष्ण रिसॉर्टमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते. माया शिंदे यांनी फनी गेम्सचे सूत्रसंचालन केले. या वेळी सप्तसूर म्युझिकल्सतर्फे गीतगायनाचा बहारदार कार्यक्रम झाला. यात चैतन्य पटवर्धन व सहकार्‍यांनी सुमधूर गीते गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. गुणदर्शन कार्यक्रमात राजन खानविलकर, शैला वालावलकर, रजनी आचरेकर, इंद्रायणी प्रभुदेसाई, प्रतिभा मराठे, सुचेता उपळेकर, भालचंद्र करंदीकर, रमेश सुर्वे आदींनी भाग घेतला. शैला आरेकर, शमीन काझी, अकबर ठाकूर, राजेश्री कदम, विद्या जाधव, शरद नातू, अनुया पेडणेकर, वैशाली सावंत, विजय कदम, श्याम मयेकर, वृषाली मोडक, अपर्णा चिटणीस, अजित साळवी, राजेंद्र धुरत, अनिल उपळेकर, स्मिता खानविलकर, स्मिता पिळणकर उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Indrayani Prabhudesai. About 163 Days ago
A well organised n an excellent team work it.was.It gave tremendous energy n lots of happiness.thanking the arrengers by heart.
1
0
Rajan Khanvilkar About 163 Days ago
It's really innovative.I am surprised to know about this fastest mode of communication! Excellent!!
0
0
Shamim Mukadam Kazi About 163 Days ago
Great work by Mr.Rajan Sawant and his great team .Thanks a lot
1
0

Select Language
Share Link
 
Search