Next
‘इंडसर्च’संशोधन प्रबंध स्पर्धेत पांडुरंग कसबे विजेता
प्रेस रिलीज
Tuesday, March 13 | 06:19 PM
15 0 0
Share this story

पुणे :  इंडसर्चच्या ‘प्रोफेसर प्रमोद पारखी सेंटर फॉर बँकिंग, फायनान्स अँड इन्श्युरन्स’तर्फे सहावी आंतरमहाविद्यालयीन संशोधन प्रबंध स्पर्धा (इंटर कॉलेजिएट रिसर्च पेपर कॉम्पिटिशन) आयोजित करण्यात आली होती. ‘ग्रोइंग एनपीएज अँड फ्यूचर ऑफ बँकिंग इन इंडिया’ ही या स्पर्धेची संकल्पना होती. या स्पर्धेचे उदघाटन बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, संचालक जोग, अॅड. श्रीपाद पंचपोर, इंडसर्चचे सरसंचालक डॉ. अशोक जोशी, इंडसर्चच्या संचालिका डॉ. अपर्णा टेंबुलकर, आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. शाम वाघ आणि समन्वयक साहिल शाह आदी मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धेत १८ महाविद्यालयांनी सहभाग घेतला असून एकूण ४० संशोधन प्रबंध सादर करण्यात आले.

या स्पर्धेत मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा विद्यार्थी पांडुरंग कसबे हा प्रथम क्रमांकाचा विजेता ठरला. दुसरे पारितोषिक बीएमसीसी महाविद्यालयाचे अनुष्का कुंभार, राधा चौधरी, हरप्रीत कौर आणि इंडसर्चमधील एमबीएचे विद्यार्थी सचिन भुरसे, राहुल काळवडे, महेश तांदळे तसेच औरंगाबादच्या  एसबीईएस कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्सच्या  हर्षिता ठाकूर यांना संयुक्तिकपणे मिळाले. मुंबईच्या अण्णा लीला कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सचा  वर्षित शाह, आयसीएफएआय बिझनेस स्कूलचे भिनव बसू आणि अंकिता ओझा यांच्यासह  इंडसर्च बीएमएसचे रितिका पटवर्धन,यशराज भालेराव आणि अथर्व भट यांनी तृतीय पारितोषिक पटकाविले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link