Next
ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर
प्रेस रिलीज
Thursday, March 22, 2018 | 04:14 PM
15 0 0
Share this article:

डॉ. प्रभा अत्रेपुणे : पुण्यभूषण फाउंडेशन (त्रिदल, पुणे) आणि पुणेकरांच्या वतीने दिला जाणारा ‘पुण्यभूषण पुरस्कार २०१८’ ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना देण्यात येणार आहे. हा पुरस्कार त्यांच्या गायन क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी देण्यात येत आहे, अशी माहिती ‘पुण्यभूषण फाउंडेशन’चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी पत्रकाद्वारे दिली. 

एक लाख रुपये रोख आणि बालशिवाजींची सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली प्रतिमा आणि पुण्याच्या ग्रामदेवतांसह असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण स्मृतिचिन्हाने या वर्षीच्या पुण्यभूषण पुरस्कारार्थी प्रभा अत्रे यांना गौरविण्यात येणार आहे. ही निवड पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने केली आहे. लवकरच हा पुरस्कार पंडित हरिप्रसाद चौरसिया, पंडित अमजद अलीखान, पंडित जसराज, पंडित शिवकुमार शर्मा यांच्यासारख्या त्याच क्षेत्रातील दिग्गजांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. (डॉ. प्रभा अत्रे यांच्या पुस्तकांसाठी https://goo.gl/WrBZuUयेथे क्लिक करा.) 

या पुरस्काराचे यंदाचे तिसावे वर्ष आहे. या पुरस्काराबरोबर सहा स्वातंत्र्यसैनिकांनाही गौरविण्यात येणार आहे. यामध्ये रघुनाथ गंगाराम लकेश्री, बलबीर सिंग, संदीप बाजीराव उकिरडे, श्रीमती विनिता अशोक कामटे (दिवंगत अशोक कामटे यांच्या वीरपत्नी), दीनदयाळ वर्मा, प्रल्हाद कृष्णराव रेभे यांचा समावेश आहे.

पुण्यभूषण पुरस्काराचा इतिहास :
यापूर्वी ज्येष्ठ गायक पं. भीमसेन जोशी, राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे दिवंगत काका केळकर, शंतनुराव किर्लोस्कर, डॉ. बानुबाई कोयाजी, सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार, डॉ. रा. ना. दांडेकर, डॉ. मोहन धारिया, डॉ. जयंत नारळीकर, प्रतापराव ऊर्फ तात्या गोडसे, ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे, जयंतराव टिळक, डॉ. जब्बार पटेल, राहुलकुमार बजाज, डॉ. के. बी. ग्रँट, विख्यात नृत्यसाधक डॉ. रोहिणी भाटे, डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, विख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. शां. ब. मुजुमदार, डॉ. रा. चिं.ढेरे, डॉ. ह. वि. सरदेसाई, श्रीमती निर्मलाताई पुरंदरे, सुधीर गाडगीळ, डॉ. सायरस पूनावाला, प्रतापराव पवार, भाई वैद्य यांना पुण्यभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. गेल्या वर्षी हा पुरस्कार डॉ. के. एच. संचेती यांना देण्यात आला होता. (पुण्यभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने घेतलेली डॉ. संचेती यांची मुलाखत वाचण्यासाठी https://goo.gl/QStwW2येथे क्लिक करा.)

प्रणव मुखर्जी, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी सभापती सोमनाथ चटर्जी, मनोहर जोशी, शरद पवार, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, क्रिकेटपटू कपिल देव व सचिन तेंडुलकर, पांडुरंगशास्त्री आठवले, विलासराव देशमुख, ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार, वसंतराव साठे, नानासाहेब गोरे, सी. सुब्रह्मण्यम्, मधु दंडवते, ‘दी हिंदू’चे संस्थापक-संपादक एन. राम, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, सुशीलकुमार शिंदे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी, नाट्यदिग्दर्शक गिरीश कार्नाड, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा, प्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार, पृथ्वीराज चव्हाण, डॉ. विकास आमटे, आशा भोसले, नारायण मूर्ती,  शरद यादव, नितीन गडकरी आदी मान्यवरांच्या हस्ते पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करून नामांकित पुणेकरांचा सन्मान करण्यात आला आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search