Next
यंदा ‘मौनांतर’ पुण्यासह, मुंबईतही रंगणार
प्रेस रिलीज
Monday, July 02, 2018 | 02:45 PM
15 0 0
Share this story

पुणे : वाइड विंग्ज मीडिया, ड्रीम्स टू रिअॅलिटी व फेअरी टेल मीडिया स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या पाच वर्षांपासून पुण्यात आयोजन केली जाणारी मौनांतर मूकनाट्य स्पर्धा यंदा पुण्याबरोबरच मुंबईतही होणार आहे. मागील दोन वर्षांत या स्पर्धेला इतरही जिल्ह्यांमधून, विशेषतः मुंबईहून येणारा प्रतिसाद पाहता यावर्षी मुंबईतही  एक दिवसीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबईतील स्पर्धा सहा जुलै रोजी रवींद्र नाट्य मंदिर, मिनी, दादर येथे सायंकाळी चार ते रात्री १० या वेळेत होईल. पुण्यातील स्पर्धा सात व आठ जुलै रोजी रात्री नऊ ते १२ या वेळेत भरतनाट्य मंदिर येथे होतील.

कोणत्याही शब्दांशिवाय, केवळ हावभाव, हालचाली व निखळ अभिनयाच्या माध्यामातून प्रेक्षकांवर मोहिनी घालण्याची कला म्हणजे माईम प्ले. ( थोडक्यात बिनसंवादाचे नाटक. थिएटरच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग करू पाहणाऱ्या लोकांसाठी ही एक पर्वणीच आहे.

यंदाची स्पर्धा पुणे व मुंबई अशा दोन ठिकाणी घेण्यात येणार असली, तरी पहिल्या तीन क्रमांकांचा विचार करताना दोन्ही केंद्रांवरचा निकाल एकत्रच लावण्यात येणार आहे. यंदा एकूण २७ संघ सहभागी होत आहे. पुण्यात एकूण २० संघ, तर मुंबईत एकूण सात संघ सादरीकरण करतील. स्पर्धेत यंदा फर्ग्युसन कॉलेज, एमआयटी कॉलेज, बीएमसीसी कॉलेज, भरतनाट्य मंदिर पुणे, मॉडर्न कॉलेज आदींसारख्या नामवंत संस्था, कॉलेज सहभागी झाल्या आहेत.

स्पर्धेची प्रवेशिका प्रतिसत्र १०० रुपये व पूर्णोत्सव प्रवेशिका ३०० रुपये आहे. या प्रवेशिका एक जुलैपासून नाट्यगृहवर उपलब्ध होतील. स्पर्धेचा बक्षीस समारंभ व विजेत्या नाटकांचे प्रयोग पुण्यातील भरतनाट्य मंदिर येथे १५ जुलै २०१८ रोजी होईल. स्पर्धेच्या पहिल्या तीन विजेत्या संघास अनुक्रम्रे १५ हजार, १० हजार आणि सात हजार ५०० रूपये व प्रत्येकी मानचिन्ह असे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.

प्रवेशिकेसाठी संपर्क : ७४४७४ ०५८४४.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link