Next
नवजात शिशूंसाठी हिवाळ्यातील काळजी
प्रेस रिलीज
Tuesday, February 20 | 01:08 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘बाळाची त्वचा नैसर्गिकरित्या आर्द्र आणि ओलसर असते आणि बाळाच्या त्वचेची मृदूता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक कोमल निगा नैसर्गिक उत्पादनांतूनच मिळते,’ असा सल्ला आयुर्वेद तज्ज्ञ आणि हिमालया ड्रग कंपनीच्या संशोधन व विकास तज्ज्ञ डॉ. प्रतिभा यांनी दिला.  

हिवाळा हा एक असा ऋतू आहे ज्याची बहुतांश पालकांना त्यांच्या मुलांच्या प्रतिकारशक्तीबाबत काळजी वाटत असते. तापमान कमी होण्याबरोबरच वारंवार संक्रमण होण्याचीही अतिरिक्त जोखीम असते. बाळाची संवेदनशील त्वचा हिवाळ्यात कोरडी पडू नये, यासाठी जास्त काळजी घ्यावी लागते.

डॉ. प्रतिभा पालकांना अशी बेबी केअर उत्पादने वापरण्याची शिफारस करतात जी वनौषधी आणि नैसर्गिक घटकांनी समृध्द असतील, जसे की ऑलिव्ह ऑईल, कोरफड, जास्वंद, बदामाचे तेल आणि खोबरेल तेल. ज्यामुळे कोरडी त्वचा मऊ मुलायम होते.

‘तुमच्या बाळाला मालीश करण्यामुळे त्याच्या त्वचेमध्ये आर्द्रता मुरण्यास मदत होते. ऑलिव्ह ऑईल आणि बदामाचे तेल असलेल्या मॉयश्चरायझरमुळे त्वचेची कोमलता सुधारते. हिवाळ्यामध्ये डायपर रॅश सामान्य असतो आणि यासाठी बाळाच्या पार्श्वभागावरवर त्रासदायक पुरळ येऊ नये यासाठी डायपर रॅश क्रीम वापरावी,’ असा सल्ला डॉ. प्रतिभा देतात.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link