Next
आय बुक
BOI
Monday, July 09 | 10:23 AM
15 0 0
Share this story

प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. आदित्य श्रीकांत केळकर यांचे हे पुस्तक म्हणजे डोळ्यांविषयी सर्व काही अशा स्वरूपाचे आहे. या पुस्तकात ते डोळ्यांच्या समस्या, विकार आदींसंबंधी सुलभ भाषेत माहिती देतात. मोतीबिंदू म्हणजे काय आणि झाल्यास शस्त्रक्रिया कधी करावी, काचबिंदू झाल्यास कोणते औषधोपचार घ्यावेत, रेटीनोपॅथीवर उपाय काय अशा मुद्द्यांवर त्यांनी माहिती दिली आहे.

भारतात सुमारे ६८ लाख नागरिकांना बुबुळाच्या विकारामुळे अंधत्व आले आहे. त्यामध्ये दरवर्षी सुमारे ३० हजार नव्या रुग्णांची भर पडते. नेत्रदान हा त्यावरील उपाय होऊ शकतो; परंतु नेत्रदानासंबंधी जागरुकता नाही. या पार्श्वभूमीवर नेत्रदान व नेत्ररोपण हा विषय पुस्तकात समाविष्ट आहे. तिरळेपण, डोळे येणे, रांजणवाडी व पापणीचे विकार यासंबंधीची माहितीही ते देतात.

प्रकाशक : बुकगंगा पब्लिकेशन्स
पाने : १०७
किंमत : १५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. ‘आय बुक’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link