Next
पी. परमेश्वरन यांच्या अनुवादित ग्रंथाचे २४ जुलैला प्रकाशन
BOI
Friday, July 19, 2019 | 03:37 PM
15 0 0
Share this article:

पुणे : विवेकानंद केंद्राचे राष्ट्रीय अध्यक्ष पी. परमेश्वरन लिखित ‘हिंदू राष्ट्राची हृदयस्पंदने’ या मराठी अनुवादित ग्रंथाचे २४ जुलैला ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांच्या हस्ते या ग्रंथाचे पुण्यात प्रकाशन होणार आहे. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख डॉ. अनिरुद्ध देशपांडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात २४ जुलैला सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होईल. विवेकानंद केंद्र (कन्याकुमारी) या संस्थेचे महाराष्ट्र प्रांत संचालक किरण कीर्तने, विवेकानंद केंद्राच्या मराठी प्रकाशन विभागाचे सचिव सुधीर जोगळेकर यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली आहे. 

पी. परमेश्वरन यांच्या गेल्या ५० वर्षांतील साहित्याचा संपादित ग्रंथसंग्रह ‘हार्ट बीट्स ऑफ हिंदू नेशन’ या नावाने इंग्रजीत प्रकाशित झाला असून, हा ग्रंथ मराठीत तीन खंडात येत आहे. दत्ता पंचवाघ, अरुण करमरकर, भगवान दातार यांनी तीन खंडांचा भावानुवाद केला आहे. ‘हिंदू राष्ट्राची हृदय स्पंदने’ हा भावानुवाद म्हणजे तीन खंडांचा संच आहे. 

कार्यक्रमाविषयी :
दिवस : बुधवार, २४ जुलै २०१९
वेळ : सायंकाळी सहा वाजता
स्थळ : पुणे श्रमिक पत्रकार संघ, नवी पेठ, पुणे 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 33 Days ago
Good thing , it is being translated .
0
0

Select Language
Share Link
 
Search