Next
प्लास्टिक बंदीबाबत पर्यावरणमंत्र्यांनी घेतला आढावा
प्रेस रिलीज
Wednesday, June 12, 2019 | 03:54 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंत्रालयात प्लास्टिक बंदी आणि मिठी नदीवरील अतिक्रमण निष्कासित करण्यासंदर्भात आढावा घेतला. या वेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, प्रधान सचिव अनिल डिग्गीकर उपस्थित होते.

या वेळी बोलताना कदम म्हणाले, ‘मुंबई आणि मुंबई परिसरात प्लास्टिक बंदी मोहीम यशस्वी होत असून, क्रॉफर्ड मार्केट आणि दादरच्या फुल मार्केटमध्ये काही दुकानदार फुले आणि भाजी देण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचा सरार्स वापर करताना दिसतात. महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी अशा विक्रेत्यांवर कारवाई सुरू करून दंड आकारावा. या परिसरात पहाटे चार-पाच वाजता प्लास्टिक घेऊन गाड्या येतात. अशा गाड्यांवर कारवाई करून पोलिसांत तक्रार दाखल करावी. असे प्लास्टिक कोणत्या शहरातून येते, त्या कंपनीचे नाव याची देखील नोंद घ्यावी.’

मिठी नदी परिसरात असलेल्या झोपड्यांचे सर्वेक्षण तातडीने पूर्ण करून त्यांना नोटीसा द्या. त्याचबरोबर अनधिकृत झोपडपट्यांवर कारवाई करण्याच्या सूचना कदम यांनी या बैठकीत दिल्या. या बैठकीला पर्यावरण विभागाचे तसेच मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search