Next
हिंदकॉन केमिकल्सच्या आयपीओला १३२ पट मागणी
प्रेस रिलीज
Tuesday, March 13 | 04:46 PM
15 0 0
Share this story

पुणे : विविध रासायनिक उत्पादनांच्या निर्मितीमध्ये सक्रिय असलेल्या हिंदकॉन केमिकल्स लिमिटेडच्या समभागाची नुकतीच एनएसई इमर्ज प्लॅटफॉर्मवर नोंदणी झाली. या समभाग विक्रीला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. या समभागाची मागणी १३२ पट अधिक झाली.

नोंदणीनंतर लगेच हा शेअर वीस  टक्क्यांनी वधारला. प्राथमिक समभाग विक्रीची (आयपीओ) किंमत प्रतिशेअर २८ रुपये असताना हा शेअर ३३ रुपये ६० पैसे किंमतीला उघडला. ही समभाग विक्री गेल्या २६ ते २८ फेब्रुवारी दरम्यान झाली. त्याअंतर्गत दहा रुपये दर्शनी मूल्याचे २७ लाख ६० हजार समभाग प्रत्येकी २८ रुपये किंमतीला विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले.यातून ७ कोटी ७३ लाख रुपये भांडवल उभारणीची योजना असून ही रक्कम खेळत्या भांडवलाच्या गरजेची पूर्तता, तसेच सर्वसाधारण कंपनी खर्च व समभाग विक्रीच्या खर्चासाठी वापरली जाणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link