Next
लक्ष्मीकांत देशमुख यांची कॉसमॉस बँकेला सदिच्छा भेट
प्रेस रिलीज
Tuesday, February 13 | 03:12 PM
15 0 0
Share this story

कृष्णकुमार गोयल, लक्ष्मीकांत देशमुख, मिलिंद काळे व गोविंद क्षीरसागर

पुणे : ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी १२ फेब्रुवारी २०१८ रोजी कॉसमॉस बँकेच्या मुख्य कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी देशमुख यांचे स्वागत करून, त्यांचा परिचय करून दिला. 

या वेळी देशमुख म्हणाले, ‘माझे लेखन हे समाजकेंद्री आहे. सामाजिक विषयांवरील लिखाण हेच टिकाऊ असेल. प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना समाजातील विविध प्रश्न, समस्या जाणून घेता आल्या. अनेक माणसं भेटत गेली आणि मी लिहीता झालो. साहित्य समाजाचा आरसा आहे म्हणून समाजाचं प्रतिबिंब आपल्या लेखनात पडलं पाहिजे असं मला वाटतं. मनोरंजन आणि विरंगुळ्यासाठी साहित्य, हा समज आता कालबाह्य झाला आहे. 
समाजातील प्रश्नांबद्दल लिहीणं मला जास्त आवडतं. मी स्वतःला साहित्य सेवक मानतो. गरीबांचा आवाज होणं हीच माझ्या लिखाणाची स्फूर्ति आहे. यापुढे मराठी भाषेसाठी मला काम करायचं असून प्रत्येक मराठी माणसानं मराठी भाषा टिकावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.’

याप्रसंगी देशमुख यांनी कॉसमॉस बँकेच्या प्रगतीचे विशेष कौतुक केले. बँकेचा लौकिक चांगला असून भविष्यकाळातही बँक आणखी मोठी व्हावी अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. 

कॉसमॉस बँकेचे उपाध्यक्ष गोविंद क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. बँकेचे ज्येष्ठ संचालक कृष्णकुमार गोयल यांनी आभार प्रदर्शन केले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link