Next
‘भक्तिरंग’ मैफलीचे आयोजन
प्रेस रिलीज
Friday, September 14 | 05:26 PM
15 0 0
Share this story

सुजाता गुरवपुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत किराणा घराण्यातील स्वर गायिका सुजाता गुरव यांच्या ‘भक्तिरंग’ मैफलीचे आयोजन केले आहे.  

ही मैफल शुक्रवार, दिनांक २१ सप्टेंबर २०१८ रोजी भारतीय विद्या भवनच्या सेनापती बापट रस्त्यावरील सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात सायंकाळी सहा वाजता होणार आहे, अशी माहिती ‘विद्या भवन’चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.

सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम मालिकेतील हा ५४ वा कार्यक्रम आहे. या मैफिलीत सुजाता गुरव यांना पंडित नंदीकेश्वर गुरव (तबला), मुकुंद जोशी (ताल), उपेंद्र सहस्रबुद्धे (हार्मोनियम), शिवाजी कदम (पखवाज) हे साथसंगत करणार आहेत.

मैफलीविषयी :
दिवस :
शुक्रवार, २१ सप्टेंबर २०१८
वेळ : सायंकाळी सहा वाजता
स्थळ : भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रोड, पुणे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link