Next
‘टायकॉन’मध्ये नव उद्योजकतेवर सादर होणार अहवाल
प्रेस रिलीज
Saturday, April 13, 2019 | 01:04 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘दी इंडस आंत्रप्रेन्युअर्स’तर्फे कोरेगाव पार्क येथील दी वेस्टीन हॉटेल येथे १२ व १३ एप्रिल २०१९ दरम्यान आयोजित ‘टायकॉन पुणे २०१९’ या परिषदेत पुण्यातील नवउद्योजकतेवर (रिपोर्ट ऑन आंत्रप्रेन्युअरशिप इन पुणे) अहवाल सादर होणार आहे. या अहवालासाठी ‘दी इंडस आंत्रप्रेन्युअर्स पुणे’ आणि ‘केपीएमजी’ने सहयोग केला असून, हा अहवाल १३ एप्रिलला सादर केला जाणार आहे.

‘टायकॉन’चे हे सातवे सत्र असून, ‘दी सेकंड वेव’ ही या वर्षीची संकल्पना आहे. स्टार्टअप क्षेत्रात एक नवा आदर्श ठेवण्यासाठी उद्योजकांना साह्य करणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे. नवउद्योजकांसाठी असलेल्या या दोन दिवसीय उपक्रमात ७००हून अधिक नवउद्योजक सहभागी होतात. ‘टायकॉन पुणे २०१९’ या कार्यक्रमादरम्यान होणारी चर्चा मुख्यतः पाच विषयांवर आधारलेली असेल. त्यामध्ये टेलिकॉम, एअर लाइन्स, बँकिंग क्षेत्रात झालेले बदल, उत्पादन क्षेत्रात नवउद्योजकता व संकल्पनांचा अभाव, आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेले विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले आरोग्य क्षेत्र, कृषी आणि लघु व मध्यम उद्योग, भविष्यकेंद्रित नवसंकल्पना आणि देशात नवउद्योजकतेला चालना यांचा समावेश आहे.

या प्रसंगी बोलताना ‘दी इंडस आंत्रप्रेन्युअर्स’चे अध्यक्ष व ‘मोजो नेटवर्क्स’चे सहसंस्थापक किरण देशपांडे म्हणाले, ‘‘टीआयई पुणे’ने नेहमीच गुणवत्ता आणि आशय यांना केंद्रस्थानी ठेवले आहे. आमच्या संस्थेशी जोडले गेलेले अनुभवी उद्योजक व मार्गदर्शक हे या परिषदेमध्ये नवउद्योजकांना त्यांच्या उद्योगप्रवासामध्ये प्रभाव पडणाऱ्या महत्त्वाच्या घटकांसंदर्भात डीप डाइव्ह कार्यशाळा घेतील. ‘टायकॉन’मधील सहभागी झालेल्या नवउद्योजकांना अनेक विषयांतून आपल्या आवडीचे पर्याय निवडता येतील. डीप डाइव्ह कार्यशाळांना याआधी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, या वर्षी या कार्यशाळांमध्ये अनेक विषय असतील. यामध्ये स्टार्टअप्समधील गुंतवणूक, व्याप्ती वाढविण्यासाठी विक्री व विपणन समजणे, ब्रँडिंग, डिझाइन थिंकिंग, आपल्या नवसंकल्पनांना मान्यता मिळवून देणे आदींचा समावेश आहे. या वर्षीचे वक्ते हे अनेक उद्योगातील अनुभवी तज्ज्ञ असून, भविष्यकेंद्रीत संकल्पना आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान याविषयी योग्य मार्गदर्शन मिळेल.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search