Next
‘हॉस्टेल डेज’चा टेलिव्हिजन प्रीमिअर ‘स्टार प्रवाह’वर
प्रेस रिलीज
Friday, August 10, 2018 | 02:48 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : प्रार्थना बेहेरे, आरोह वेलणकर, विराजस कुलकर्णी, अक्षय टंकसाळे आणि संजय जाधव यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘हॉस्टेल डेज’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर १२ ऑगस्टला दुपारी एक वाजता आणि सायंकाळी सात वाजता ‘स्टार प्रवाहवर’ पाहता येणार आहे.

‘हॉस्टेल डेज’ची आठवण करून देणारा हा सिनेमा आहे. यात १९९० चा काळ दाखवण्यात आलाय. साताऱ्यातील कोपरगाव या काल्पनिक ठिकाणी स्थित एका हॉस्टेलची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळेल. त्याकाळात हॉस्टेल ही संकल्पना नव्याने रुजू लागली होती. हे जग विद्यार्थ्यांसाठी नवे होते. शिक्षणासाठी घरापासून दूर राहावे लागत असल्यामुळे कॉलेज हेच त्यांचे दुसरे घर बनले होते. शिवाय मोबाइल, इंटरनेट या गोष्टी नसल्यामुळे मित्रपरिवार घट्ट होता. मित्रमंडळींच्या सहवासातल्या काही हसऱ्या आणि काही मनाला चटका लावणाऱ्या आठवणींची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

१९९० चा काळ हा रोमँटिक गाण्यांसाठी देखील ओळखला जातो. त्यामुळे ‘हॉस्टेल डेज’ सिनेमातूनही असाच सांगीतिक नजराणा मिळणार आहे. या सिनेमात एकूण आठ गाणी आहेत आणि ती आघाडीच्या बॉलिवूड गायकांनी गायली आहेत. सोनू निगम, कुमार सानू, शंकर महादेवन, शान, कुणाल गांजावाला, अवधूत गुप्ते आणि बेला शेंडे यांसारखे आघाडीचे गायक त्यासाठी एकत्र आले आहेत. ‘हॉस्टेल डेज’चे दिग्दर्शन आणि संगीत अजय नाईक यांनी केले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search