Next
‘सुदृढ बिगरबँकिंग वित्तीय संस्था राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या’
वाय. एच. मालेगम यांचे प्रतिपादन
BOI
Wednesday, July 17, 2019 | 06:21 PM
15 0 0
Share this article:

नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालयाच्या ५१ व्या वर्धापनदिनानिमित्त डॉ. उमराणी यांच्या हस्ते वाय. एच. मालेगम यांना ‘स्कॉलर ऑफ द ईयर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी (डावीकडून) गिरीजा शंकर, उमराणी, मालेगम, डॉ. सर्जेराव निमसे व डॉ.चौधरी

पुणे : ‘दुर्बल घटकांना वित्तपुरवठा करणाऱ्या बिगरबँकिंग वित्तीय संस्थांचा (एनबीएफसी) भारतातील वित्तपुरवठा क्षेत्रात मोलाचा वाटा आहे. या संस्थांचे आरोग्य चांगले राहणे ही राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे,’ असे मत पद्मश्री पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध चार्टर्ड अकाऊंटंट वाय. एच. मालेगम यांनी व्यक्त केले.

मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालयाच्या ५१ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या समारंभात मालेगम यांना या वर्षीचा ‘स्कॉलर ऑफ द ईयर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांच्या हस्ते मालेगम यांना गौरविण्यात आले. या पुरस्कार वितरणापूर्वी ‘बिगरबँकिंग वित्तीय संस्थांचे भवितव्य’ या विषयावर मालेगम यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. 

नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या गिरीजा शंकर, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रकाश एन. चौधरी, सोसायटीचे विश्वस्त डॉ. मनोहर सानप, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या स्मिता कुंदे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. मालेगम यांच्या व्याख्यानंतर उमराणी यांच्या हस्ते, तसेच लखनौ विद्यापीठ व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालेगम यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी नेस वाडिया महगाविद्यालयाचे माजी प्राचार्य व्ही. के. नूलकर, डॉ. विद्या देवधर आणि डॉ. एच. व्ही. देवस्थळी यांचाही सन्मान करण्यात आला.

चार्टर्ड अकाऊंटंट वाय. एच. मालेगम
आपल्या व्याख्यानात मालेगम म्हणाले, ‘बिगरबँकिंग वित्तीय संस्था ठराविक क्षेत्रांना वित्तपुरवठा करत असल्यामुळे त्या क्षेत्रांमध्ये आलेल्या मंदीचा ‘एनबीएफसी’वर मोठा परिणाम होतो. याच प्रमाणे ‘एनबीएफसी’च्या एकूण वित्ताचा मोठा भाग हा बँका, म्युच्युअल फंड्स व इतर वित्त पुरवठादारांकडून आलेला असतो. त्यामुळे ‘एनबीएफसी’ वित्त व्यवस्थापनात अपयशी ठरल्यास त्यांना वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांवरही विपरित परिणाम होऊ शकतो. ‘एनबीएफसी’ या भारताच्या वित्तपुरवठा क्षेत्रात महत्त्वाच्या आहेत. रिझर्व्ह बँकेच्या कडक नियंत्रणामुळे कमकुवत ‘एनबीएफसी’ संस्थांचे परवाने मोठ्या प्रमाणावर रद्द होऊन त्यांची संख्या घटू शकेल;परंतु त्यांच्या माध्यमातून दुय्यम प्रतीच्या कंपन्यांकडे वित्तपुरवठा वळवण्यास चाप बसेल’.

‘नेस वाडिया महाविद्यालयाची स्थापना १९६९ साली करण्यात आली असून, पुण्यातील वाणिज्य शाखेतील एक प्रतिथयश महाविद्यालय अशी ओळख संस्थेने प्राप्त केली आहे. वाणिज्य, अर्थशास्त्र, वित्त, व्यवस्थापन व व्यावसायिक शिक्षण या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्यात तज्ज्ञ व्यक्तीस दर वर्षी महाविद्यालयातर्फे ‘स्कॉलर ऑफ द ईयर’ पुरस्कार प्रदान करण्यात येतो,’ असे प्राचार्या गिरीजा शंकर यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search