Next
‘स्वप्न पाहा आणि मोठे व्हा’
BOI
Tuesday, May 15 | 12:08 PM
15 0 0
Share this story

पुणे : अंघोळीची गोळी संस्थेतर्फे आयोजित केलेल्या ‘मामाच्या गावाला जाऊ या’ या उपक्रमांतर्गत आदिवासी भागातील मुलांना पुणे दर्शन घडवण्यात येत आहे. त्यात या मुलांनी क्रिकेटच्या वस्तूंचे ‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी’ हे प्रसिद्ध संग्रहालय, तसेच बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलाला भेट दिली. या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष असून, या वर्षी ११ ते १६ मे यादरम्यान हा उपक्रम राबवला जात आहे.
 
या वेळी मुलांनी सचिन, लारा, विराट या दिग्गजांनी ज्या बॅटने मैदानावर गोलंदाजांची धुलाई केली आहे, त्या बॅट्स प्रत्यक्ष पाहिल्या. तसेच जे शूज घालून शोएब अख्तर, ब्रेट ली १६० किलोमीटर प्रतितास वेगाने गोलंदाजी करायचे ते शूज, मार्क बाउचरच्या ज्या ग्लोव्ह्जनी यष्टीमागे अनेकांना यष्टिचीत केले होते, ते ग्लोव्ह्ज मुलांना या वेळी प्रत्यक्ष पहायला मिळाले.

तसेच सचिनने ज्या बॅटने अनेक धावा केल्या आहेत ती बॅट मुलांनी हातात घेऊन पाहिली.

‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी’मध्ये विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना आयोजकांनी उत्तरे दिली. आदिवासी भागातील मुलांना हे क्रिकेट संग्रहालय खास अनुभवता यावे म्हणून मुलांना मोफत प्रवेश देण्यात आला होता.

२००८ साली ज्या क्रीडा संकुलात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा झाली, त्या संकुलाला मुलांनी भेट दिली. तेथे सुरू असलेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेचाही मुलांनी आनंद घेतला.

‘स्वप्न पाहा आणि मोठे व्हा’ अशी या वर्षीच्या कार्यक्रमाची संकल्पना आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील दहा मुले आणि दहा मुली पुण्यात आल्या आहेत. त्यांची राहण्याची व्यवस्था विद्यार्थी सहायक समितीमध्ये करण्यात आली आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link