Next
‘रुबी’तर्फे जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त जनजागृती
प्रेस रिलीज
Tuesday, May 29, 2018 | 04:42 PM
15 0 0
Share this article:

जागतिक तंबाखु निषेध दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांची माहिती देताना रुबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय पठारे, कर्करोग तज्ञ डॉ. भूषण झाडे आणि वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती ठाणेकर

पुणे : ‘जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त (वर्ल्ड नो टोबॅको डे) ३१ मे रोजी रूबी हॉल क्लिनिकतर्फे जनजागृतीसाठी विशेष उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत,’ अशी माहिती रुबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय पठारे, कर्करोग तज्ञ डॉ. भूषण झाडे आणि वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती ठाणेकर यांनी दिली.

३१ मे रोजी ‘रूबी हॉल क्लिनिकपासून सकाळी ७.३० वाजता बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बाइक रॅली रूबी हॉल क्लिनिक ते ईस्ट स्ट्रीट, एमजी रोड, कमिश्‍नर ऑफिस रोड मार्गे पुन्हा रूबी हॉल क्लिनिकपर्यंत येईल. या बाइक रॅलीद्वारे तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामाबाबत संदेश दिले जातील. याशिवाय याआधीच जनरल प्रॅक्टीशनर्ससाठी या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ३१ मे रोजी दुपारी दोन वाजता तंबाखूच्या व्यसनांपासून मुक्त कसे व्हावे यावर मार्गदर्शन दिले जाईल. याशिवाय रूबी हॉल क्लिनिकतर्फे तंबाखूमुळे होणाऱ्या कर्करोगांचे तपासणी शिबिर १५ ते ३० जून दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये रिक्षा चालकांवर लक्ष केंद्रित केले जाईल.’

सन १९८७पासून दरवर्षी जागतिक आरोग्य संघटनेचा (डब्ल्यूएचओ) उपक्रम म्हणून ३१ मे रोजी जागतिक जागतिक तंबाखू निषेध दिन (वर्ल्ड नो टोबॅको डे) पाळला जातो. संपूर्ण जगभरात कमीत कमी २४ तास, तरी पूर्णपणे सर्व प्रकारच्या तंबाखूचे सेवन वर्ज करण्यासाठी प्रोत्साहित केले जावे, असा हा दिवस साजरा करण्यामागील हेतू आहे. यावर्षीची संकल्पना टोबॅको अ‍ॅंड इटस इम्पॅक्ट ऑन कॉर्डिओ व्हॅस्क्युलर हेल्थ (तंबाखु सेवनामुळे हदयावर होणारे दुष्परिणाम) अशी आहे आणि या संकल्पनेवर आधारित उपक्रमांचे आयोजन रुग्णालयामध्ये करण्यात आले आहे.

रुबी हॉल क्लिनिकच्या कमलनयन बजाज कॅन्सर सेंटरचे अध्यक्ष आणि न्यूरोसर्जन सल्लागार डॉ. अशोक भणगे म्हणाले, ‘जे लोक धूम्रपान करण्याची सवय दहा वर्षांच्या सवयीनंतर देखील मोडतात त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका जे लोक धूम्रपान करणे सुरूच ठेवतात त्यांच्या तुलनेत ३० ते ५० टक्क्यांनी कमी होतो. पाच वर्षांमध्ये ही सवय सोडली, तर तोंडाचा आणि अन्ननलिकेचा कर्करोग होण्याच्या शक्यतेचे प्रमाण निम्मे होते. या उपक्रमासाठीचे एक अग्रेसर रुग्णालय म्हणून आम्हाला ही जागरूकता करणे गरजेचे आहे की कर्करोग आणि हृदय विकाराच्या झटक्याच्या सर्वात प्रमुख कारणांपैकी एक तंबाखूचे सेवन करणे हे आहे. विविध सामाजिक स्तरांतील लोक वेगवेगळ्या प्रकारच्या तंबाखू सेवनाचे व्यसनाधीन असतात ज्याचा त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. सिगारेटमध्ये असलेले केमिकल प्रत्येकावरच अगदी शरीराच्या प्रतिकारशक्तीपासून ते अवयवांच्या कार्यक्षमतेपर्यंत सगळ्यांवर हानिकारक परिणाम करते.  प्रतिबंध नेहमीच उपचार करण्यापेक्षा उत्तम असते आणि म्हणून याबाबत जागरूकता आवश्यक आहे.’

रुबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय पठारे म्हणाले, ‘एक वैद्यकीय संस्था म्हणून आम्ही तंबाखूपासून मुक्त करण्यामध्ये नेहमी अग्रेसर राहिलो आहोत आणि पुढेही राहू. अनेक आयुष्ये यामुळे उद्ध्वस्त झाली आणि हीच वेळ आहे केली की याविरुद्ध लढण्यासाठी आपल्यातील प्रत्येकाने सज्ज असले पाहिजे. सर्वांनाच माहिती आहे की सर्वच प्रकारातील तंबाखू आरोग्यास घातक असतो. या जागतिक तंबाखु निषेध दिनाच्या निमित्ताने आपण प्रत्येकाला त्यांच्या स्वतःच्या, कुटुंबियांच्या व मित्रजनांच्या आरोग्याबाबत आणि जीवनशैलीबाबत सावधान केले पाहिजे. त्यामुळे आताच या गोष्टींचे सेवन थांबवा, स्वतःची आरोग्य तपासणी करून घ्या कदाचित यामुळे तुमच्या जीवाला भविष्यात होणारा धोका टळेल.’

रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट म्हणाले, ‘आरोग्यास घातक असूनही मद्यपानाप्रमाणेच तंबाखूचे सेवन देखील अजूनही समाजमान्य आहे. खरे तर लोक याबद्दल अनभिज्ञ आहेत की सर्व प्रकारचे कर्करोग, ३०-४० टक्के रोग फक्त कोणत्या ना कोणत्या प्रकारे तंबाखूचे सेवन केल्याने होतात. तंबाखू संबंधित एकूण कर्करोगांपैकी तीन-चतुर्थांश कर्करोग डोके आणि मानेचे कर्करोग आहेत यामध्ये तोंडातील कीड, जीभ, अन्ननलिका यांचा समावेश होतो. तर जवळपास एक तृतीयांश फुफ्फुसाचे कर्करोग आहेत. धूम्रपान, सिगारेट्स, सिगार्स किंवा पाइप्स, तंबाखूचे सेवन, तपकिर ओढणे ही सर्व डोके आणि मानेचे कर्करोग होण्याची सर्वात मुख्य कारणे आहेत.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bhausaheb lawande About
Nice information about awareness of eating tobacco... ..
0
0

Select Language
Share Link
 
Search