Next
रत्नागिरीतील १० वर्षांच्या आशयला फिडे मानांकन
आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन मिळवणारा एकाच कुटुंबातील तिसरा बुद्धिबळपटू
BOI
Monday, June 03, 2019 | 12:59 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : रत्नागिरीतील मयेकर कुटुंबाने एक वेगळीच चमकदार कामगिरी केली आहे. या कुटुंबातील आशय या १० वर्षांच्या मुलाने नुकतेच बुद्धिबळातील आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन प्राप्त केले आहे. याआधी त्याचा मोठा भाऊ आयुष यानेही फिडे मानांकन प्राप्त केले असून, त्यांचे वडील जयेश मयेकरही फिडे मानांकनप्राप्त बुद्धिबळपटू आहेत. मयेकर कुटुंबीयांच्या या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

१० वर्षांच्या आशयने सांगलीत नुकत्याच झालेल्या बुद्धिबळ महोत्सवात कै. बाबुकाका शिरगावकर खुल्या फिडे मानांकन स्पर्धेत उत्तम कामगिरी केली. त्याला ११८९ एवढे आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन मिळाले. आशयने स्वतःपेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मानांकित खेळाडूंविरुद्ध चांगली लढत दिली. दहा वर्षे वयोगटात आशयला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.

आशय हा मयेकर कुटुंबातील आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करणारा तिसरा व सर्वांत लहान सदस्य आहे. आशयचे वडील जयेश मयेकर व मोठा भाऊ आयुश यांनी यापूर्वीच मानांकन प्राप्त केले आहे. बुद्धिबळ खेळायला लागल्यापासून दोन वर्षांत मयेकर कुटुंबीयांनी मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल बुद्धिबळ जगतात त्यांचे कौतुक होत आहे.

आशयचा मोठा भाऊ आयुष याने सांगली येथील बुद्धिबळ महोत्सवासह नुकत्याच गोवा व मुंबई येथे झालेल्या फिडे मानांकन स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश प्राप्त केले. गोव्यात झालेल्या तिसऱ्या युनिक अखिल भारतीय खुल्या स्पर्धेत आयुषने नऊ फेऱ्यांमध्ये सहा गुणांसह स्वतःच्या फिडे मानांकनात ३१ गुणांची वाढ करून खुल्या गटात सतराव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. 

मुंबईत पार पडलेल्या युनिव्हर्सल फाउंडेशनच्या खुल्या राष्ट्रीय स्पर्धेत आयुषने १४५० आतील ‘रेटिंग कॅटेगरी’मध्ये चौथा क्रमांक पटकावला. सांगली येथील स्पर्धेतही आयुशने १६ वर्षे वयोगटात द्वितीय क्रमांक मिळविला. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या यादीत आयुषचे फिडे मानांकन १४५७ एवढे झाले आहे. आयुश दिवसातून आठ ते दहा तास बुद्धिबळाचा सराव करतो.

आशय व आयुष हे रत्नागिरीतील श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मीडियम शाळेचे (जीजीपीएस) विद्यार्थी आहेत. सध्या हे दोघेही पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या १५ वर्षे वयोगटातील राज्य अजिंक्यपद व निवड बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Vaishali Shirke About 74 Days ago
Hearty congratulations
0
0
SANJEEV ARVIND GOLATKARअअ About 75 Days ago
Congratulations
0
0

Select Language
Share Link
 
Search