Next
महिंद्राची पेट्रोल पॉवर्ड एक्सयूव्ही 500
BOI
Wednesday, December 06 | 12:29 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड’ या भारतातील अग्रणी एसयूव्ही उत्पादक कंपनीने, प्रीमियम एसयूव्ही ‘एक्सयूव्ही500’च्या नव्या पेट्रोल प्रकाराचे पाच डिसेंबर रोजी उद्घाटन केले. ही पेट्रोल पावर्ड एक्सयूव्ही500 सहा स्पीड ऑटोमेटिक ट्रान्समिशन सोर्स असलेल्या एका प्रकारात उपलब्ध होणार आहे. ‘जी एटी’ असे नाव असलेल्या एक्सयूव्ही 500 पेट्रोल ऑटोमेटिक गाडीची किंमत १५.४९ लाख रुपये (एक्सशोरूम दिल्ली) असणार आहे.  निवडक शहरांमध्ये ती तातडीने उपलब्ध असेल.

नव्याने सादर करण्यात आलेल्या एक्सयूव्ही500 जी एटी प्रकारात देशी बनावटीचे २.२ लीटर एमहॉक पेट्रोल इंजिन आहे. एकशे ४० एचपी (एकशे तीन केडब्ल्यू) पॉवर आणि तीनशे २० एनएम टॉर्क क्षमता आहे. एक्सयूव्ही500 जी एटी प्रकारात सहा स्पीड ऑटोमेटिक ट्रान्समिशनसह क्रीप फंक्शन आणि मॅन्युअल मोड ऑप्शनही आहे. एक्सयूव्ही500 पोर्टफोलिओमध्ये आता पेट्रोल प्रकाराचा समावेश आहेच, शिवाय डिझेल प्रकारातही विस्तारीत श्रेणी उपलब्ध आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या ऑटोमोटिव विभागाचे विक्री व वितरण विभाग प्रमुख विजय राम नाकरा यांच्या मते, ‘एक्सयूव्ही500च्या उद्घाटनापासून ही गाडी एसयूव्ही प्रकारातील ट्रेंडसेटर ठरली आहे. यात ग्रेट व्हॅल्यू प्रपोजिशनसह हेड टर्निंग स्टाइल आणि अनेक हायटेक वैविध्यांचा समावेश आहे. एक्सयूव्ही500 म्हणजे जी एटी प्रकारात परिणामकारक कामगिरी असे समीकरणच होय.’

एक्सयूव्ही500 जी ऑटोमेटिक गाडीची ठळक वैशिष्ट्ये :
•   सात इंची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम
•   ओआरव्हीएमवर लोगो प्रोजेक्शन लँप
•   स्टॅटिक बेंडिंग हेडलँप
•   रोलओव्हर मिटिगेशनसह इएसपी
•   अँड्रॉइड ऑटो
•   इमर्जन्सी कॉल
•   फुल्ली ऑटोमेटिक टेंपरेचर कंट्रोल (एफएटीसी)
•   दुहेरी एअरबॅग्ज
•   इबीडीसह एबीएस
•   इंटेलिजंट लाइट सेन्सिंग हेडलँप्स
•   स्मार्ट रेन सेन्सिंग वायपर्स
•   टायर-ट्रोनिक्स
•   क्रूझ कंट्रोल
•   पुश बटण स्टार्ट
•   पॅसिव कीलेस एंट्री
•   सर्व बाजूंनी अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link