Next
‘प्युरेटा’तर्फे लहान मुलांसाठी विविध उत्पादने
प्रेस रिलीज
Wednesday, May 09, 2018 | 03:56 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : प्युरेटा या फ्युचर कन्झ्युमर लिमिटेड (एफसीएल) कंपनीच्या बेबी केअर ब्रॅंडने खास शून्य ते तीन वर्षे वयोगटातील मुलांसाठी वापरण्यास सोप्या, स्मार्ट आणि किफायतशीर अॅक्सेसरीज सादर केल्या आहेत. उत्पादनांच्या दर्जाची हमी देणारी सर्व प्युरेटा उत्पादने १०० टक्के फूड ग्रेड प्लास्टिकपासून तयार करण्यात आली असून, ती बीपीएमुक्त आहेत. प्युरेटा उत्पादने पूर्णतः सुरक्षित असून अविषारी आहेत आणि आयएसआय, बीआयएस आणि ईएन स्टॅंडर्ड्सचे आंतरराष्ट्रीय सुरक्षा प्रमाणपत्र या उत्पादनांना लाभले आहे.

बेबी केअर अॅक्सेसरीजच्या माध्यमातून, पालकत्त्वाची प्रक्रिया ताणमुक्त करून ती अधिक आनंददायी करण्याचे वचन ‘प्युरेटा’ने दिले आहे. ‘प्युरेटा मदर्स क्लब’ या खास समुहाच्या मार्गदर्शन व सल्यानुसार ही उत्पादने बनवण्यात आली असून, या ब्रॅंडची उत्पादने खास पद्धतीने घडवण्यासाठी व ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या समुहाचा मोलाचा हातभार लागला आहे.

‘प्युरेटा’च्या बेबी केअर उत्पादनांच्या रेंजमध्ये सात कॅटेगरींमध्ये ४५ उत्पादने समाविष्ट असून, यात दुग्धपानाच्या बाटल्या, निपल्स, विनिंग बॉटल्स, सिपर्स आणि ट्रेनिंग कप्स, डायनिंग अॅक्सेसरीज, पॅसिफायर आणि टीथर्स, बेबी ग्रुमिंग, बेबी वाईप्स आणि क्लिनिंग अॅक्सेसरीज यांचा समावेश आहे. ही उत्पादने ९९ रुपयांपासून उपलब्ध आहेत.

नवीन रेंजबाबत बोलताना फ्यूचर कन्झ्युमर लिमिटेडच्या संचालिका आश्‍नी बियाणी म्हणाल्या, ‘भारतातील नियोजित बेबी केअर बाजारपेठ ही अद्याप शिशूअवस्थेत आहे. या कॅटेगरीतील ‘प्युरेटा’ हा राष्ट्रीय ब्रॅंड असून, पालक व मुलांच्या सर्व गरजांची पूर्तता आम्ही करणार आहोत. पालकत्त्वामध्ये भावनिक व शारीरिक दोन्ही प्रकारची गुंतवणूक अधिक असल्याने ही सोपी प्रक्रिया नाही. स्मार्ट आणि वापरण्यास सोपी उत्पादने सादर करून पालकत्त्वाची प्रक्रिया कोणत्याही अडचणीशिवाय पालकांना एन्जॉय करता यावी, हा आमचा प्रयत्न आहे.’

मातांकडून मार्गदर्शन घेऊन ‘प्युरेटा’ने आगळीवेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने सादर केली आहेत. बालकांना कोणत्याही बाजूने दूध वा द्रवपदार्थ पिता यावे (मुले बसलेली असताना किंवा उभी असताना, झोपलेली-आडवी असताना), यासाठी फ्लिप-फ्लॉप ३६० डिग्री अँटी-कॉलिक फिडिंग बॉटल्स आणि सिपर्स सादर केल्या आहेत. या बाटल्यांमधील विशिष्ट वजनाचे स्ट्रॉ बाळाला कोणत्याही पोझिशनमधून पेय पदार्थ ओढण्यास मदत करतात. परिणामी, मुलांना पोटदुखी किंवा अन्य पोटाचे विकार होत नाहीत. हे उत्पादन ३९९ रुपयांना उपलब्ध आहे.

थ्री इन वन सिपर या उत्पादनात वाढत्या वयाच्या बाळाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी तीन पातळ्यांवर वापरले जाणारे निपल, मऊ तोटी आणि खास स्ट्रॉ देण्यात आला आहे. बाळाचे बाटलीकडून सिपरकडे स्थित्यंतर होत असताना हे उत्पादन अत्यंत उपयुक्त ठरणार असून, हे सिपर ३७९ रुपयांना उपलब्ध आहे.

या उत्पादनांच्या रेंजमध्ये हिट सेन्सिटिव्ह स्पूनचा समावेश असून बाळ खात असलेले अन्न त्याच्यासाठी अति गरम असल्यास या चमच्यांचा रंग आपोआप बदलतो. या चमच्यांच्या कडा अत्यंत मऊ असून मुलांच्या नाजूक हिरड्यांना यामुळे कोणतीही इजा होत नाही. याचा पृष्ठभाग अत्यंत स्वच्छ व आरोग्यदायी असून, कोणत्याही ठिकाणी फिडिंग भागाला स्पर्श न करता हे चमचे ठेवता येतात. हे हिट सेन्सिटिव्ह स्पून्स केवळ १९९ रुपयांना उपलब्ध आहेत.

खट्याळ लहान मुले ताटातले अन्न सहज खाली सांडतात आणि मग अन्न फूकट जाते. असे होणे टाळण्यासाठी अँटी- स्कीड फिडिंग बाऊल्स हे वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन तयार करण्यात आले आहे. वातपोकळीच्या (व्हॅक्यूम) मदतीने कोणत्याही टेबलावर किंवा पृष्ठभागावर हे बाऊल्स चिकटून राहतील, अशी खास रचना या उत्पादनात करण्यात आली आहे. हे उत्पादन ३४९ रुपयांना उपलब्ध आहे.

सर्व ‘प्युरेटा’ उत्पादने बिग बाजार, बिग बाजार जेन नेक्स्ट, हायपरसिटी या दालनांत देशभरात उपलब्ध आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search