Next
फॉर्च्युन ‘चेंज दी वर्ल्ड’ यादीत रिलायन्स जिओ प्रथम
यादीत दोनच भारतीय कंपन्या; महिंद्रा अँड महिंद्रा २३ व्या स्थानावर
BOI
Friday, August 24, 2018 | 12:46 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : फॉर्च्युनच्या नव्या ‘चेंज दी वर्ल्ड’ या जागतिक यादीमध्ये रिलायन्स जिओने पहिले, तर महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने २३वे स्थान मिळवले आहे. ‘अलिबाबा’सारख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकून ‘जिओ’ने अव्वल स्थान पटकावले आहे. या यादीत केवळ दोनच भारतीय कंपन्यांचा समावेश आहे.  

भारतीयांना स्वस्त दरात इंटरनेट आणि कॉलिंग सेवा उपलब्ध करून डिजिटल व्यवहारांना चालना दिल्याबद्द्ल ‘जिओ’चा यात समावेश करण्यात आला आहे. गेल्या सात वर्षांमध्ये कार्बन उत्सर्जनामध्ये तब्बल ४४ टक्के घट करण्यात यश मिळवल्याबद्दल महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. या यादीत पहिल्या दहा स्थानांमध्ये ‘जिओ’नंतर दुसऱ्या स्थानावर मेर्क, त्यानंतर अनुक्रमे बँक ऑफ अमेरिका, इंडीटेक्स, अलिबाबा समूह, क्रोगेर, झायलेम, एबीबी, विट वॉचर्स इंटरनॅशनल आणि हचेस नेटवर्क सिस्टीम्स या कंपन्यांचा समावेश आहे. 

महिंद्रा आणि महिंद्रा समूह विविध उपक्रम राबवून कार्बन उत्सर्जनामध्ये घट करण्याचा प्रयत्न करत आहे. २०३०पर्यंत ऊर्जा उत्पादकता दुप्पट करण्याची बांधिलकी असणाऱ्या, ‘ईपी१००’ करारावर स्वाक्षरी करणारी ही पहिली जागतिक कंपनी आहे. गेल्या आठ वर्षांत, वाहन निर्मितीत ऊर्जेचा वापर ६३ टक्क्यांनी, तर  ट्रॅक्टर  निर्मितीत ऊर्जेचा वापर ३३ टक्क्यांनी कमी करण्यासाठी कंपनीने उत्पादन प्रक्रियेमध्ये बदल केले असून, पाच उत्पादन प्रकल्पांमध्ये ‘झीरो वेस्ट टू लँडफिल’ यशस्वीरीत्या राबवले आहे. या सगळ्या प्रयत्नांची दखल घेऊन या यादीत कंपनीला पहिल्या २५ कंपन्यांमध्ये स्थान देण्यात आले आहे. 

या जागतिक यादीत दैनंदिन कार्यामध्ये सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण, आर्थिक किंवा अन्य सामाजिक आव्हाने हाताळणाऱ्या विविध कंपन्या निवडण्यात आल्या. त्यामध्ये, किमान एक अब्ज डॉलर वार्षिक विक्री केलेल्या ५७ कंपन्यांचा व सहा रायजिंग स्टार्सचा समावेश होता.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search