Next
‘‘कृष्णा’च्या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना सुरू करणार’
प्रेस रिलीज
Monday, August 21, 2017 | 04:43 PM
15 0 0
Share this article:

Shivnagar, Karad, Satara, Yashavantrav Mohite Krushna Sahakari Sakhar Karkhana, Dr. Suresh Bhosale, शिवगनर, सातारा, कराड, यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना, डॉ. सुरेश भोसलेशिवगनर (सातारा) : ‘कामगार हा संस्थेचा कणा असून कामगारांच्या श्रमामुळे संस्थेची प्रगती होत असते. कृष्णा कारखान्याच्या या यशस्वी वाटचालीमध्ये कामगारांचे मोलाचे योगदान आहे. म्हणून कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर सन्मानपूर्वक जगता यावे यासाठी कृष्णा कारखाना कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना राबविणार आहे,’ असे मत कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केला.

साखर उद्योग क्षेत्रात दिलेल्या अभूतपूर्व योगदानाची दखल घेत रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांना देशभरातील साखर उद्योग तंत्रज्ञानाची राष्ट्रीय शिखर संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली या संस्थेच्यावतीने यंदाचा साखर उद्योगातील ‘राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’ देण्यात आला आहे. याबद्दल कारखाना कार्यस्थळावर कराड तालुका साखर कामगार संघ यांच्या वतीने चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.

या वेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन लिंबाजी पाटील, ज्येष्ठ संचालक गुणवंत पाटील, दिलीप पाटील, निवास थोरात, पांडूरंग होनमाने, संजय पाटील, अमोल गुरव, ब्रिजराज मोहिते, सुजित मोरे, मनोज पाटील, कार्यकारी संचालक सुर्यकांत दळवी, कृष्णा बँकेचे उपाध्यक्ष दामाजी मोरे, संजय गांधी निराधार योजनेचे कराड तालुका अध्यक्ष संजय पवार, जिल्हा परिषद सदस्या शामबाला घोडके, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब निकम, राजारामबापू सह.साखर कारखान्याचे माजी संचालक माणिकराव पाटील, राजारामबापू सह बँकेचे संचालक संग्राम पाटील, कृष्णा बँकेचे संचालक हर्षवर्धन मोहिते, प्रमोद पाटील, बाबुराव यादव, धनाजी पाटील, राहुल पाटील, सर्जेराव निकम, निवास पवार, डॉ. राजेश पाटील, विलास पवार, वसंतराव घोडके, आनंदराव मोहिते, कराड तालुका साखर कामगार संघाचे अध्यक्ष एम. के. कापूरकर, गणेश शिवोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, भगवान पाटील, पांडुरंग बावचकर, जालिंदर पाटील, कृष्णात मुसळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सत्कारास उत्तर देताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, ‘ऊसाचा दर हा रिकव्हरीवर ठरविला जातो. एफ आर पी देताना बाजारातील साखरेच्या दराचा विचार केला जात नाही. साखरेचा दर कमी आला तर त्याचा मोठा परिणाम साखर उद्योगावर होतो. साखर दर स्थिर ठेवण्यासाठी अनेक उपाय योजनाची गरज आहे. यामध्ये साखर जास्त निर्माण झाली तर निर्यात करावी, साखर उत्पादन कमी झाले तर आयात कमी प्रमाणात करावी व आयात साखरेवर शुल्क लावावे. साखर उत्पादन जास्त होणार असेल तर इथेनॉल निर्मितीस परवानगी द्यावी. त्याचबरोबर इथेनॉलसह, अल्कोहोल व वीज या उपपदार्थांनाही चांगला हमीभाव सरकारने दिल्यास साखरेचा दर स्थिर राहील, याचा फायदा साखर उद्योगास निश्चीतच होईल. कारखाने हे व्यावसायिकदृष्ट्या चालवले तर या उद्योगात स्थिरता मिळण्यास मदत होईल.’

या वेळी व्हा. चेअरमन लिंबाजी पाटील, आनंदराव मोहिते, एम. के. कापूरकर, जे. डी. मोरे यांनी डॉ. सुरेश भोसले यांच्या साखर उद्योगातील उल्लेखनीय कामगिरीचा आढावा सादर केला. या वेळी कराड तालुका साखर कामगार संघ, गणेश शिवोत्सव मंडळ, कामगार सोसायटी, बहे ग्रामस्थ, हुबालवाडी ग्रामस्थ यांच्यासह विविध संस्थानी डॉ. सुरेश भोसले यांचा मानपत्र, शाल, श्रीफळ देवून गौरव केला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search